IND vs NZ 1st Test Match Team India 1st Inning Updates : न्यूझीलंडविरुद्ध बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची परिस्थिती खूपच बिकट झाली आहे, ज्यामध्ये पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला होता, तर दुसऱ्या दिवशी खेळ टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंड संघाच्या गोलंदाजांनी रोहितचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा करताना भारताचा डाव ४६ धावांत गुंडाळला. या सामन्यात भारतीय संघाने ५५ वर्षांनंतर घरच्या मैदानावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला आहे, ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल.

बंगळुरू कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पावसाची शक्यता असतानाही भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खेळपट्टीतील सध्याच्या ओलाव्याचा फायदा घेत किवी संघाचे तीन वेगवान गोलंदाज टिम साऊदी, मॅट हेन्री आणि विल्यम ओ रुर्क यांनी भारतीय फलंदाजांना मोकळेपणाने खेळण्याची संधी दिली नाही. रोहित शर्मा केवळ २ धावा करून बाद झाला, तर विराट कोहली आणि सर्फराझ खान यांना खातेही उघडता आले नाही. लंचब्रेकपर्यंत भारताने ३४ धावांवर ६ विकेट्स गमावल्या होत्या. १९६९ नंतर घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने पहिल्या ६ विकेट्स इतक्या कमी धावसंख्येवर गमावण्याचा लाजिरवाणा विक्रम केला आहे. याआधी त्याने ५५ वर्षांपूर्वी हैदराबाद कसोटी सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध २७ धावांवर ६ विकेट गमावल्या होत्या.

IND vs SA Ryan Rickelton's 104 Metre Six man ran away with ball video viral
IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी
harris rauf celebrating wicket of glen maxwell
Pak vs Aus: भारताविरूद्धची तयारी पडली कांगारुंना भारी; पाकिस्तानने उडवला १४० धावात खुर्दा
nathan mcswinney
Ind vs Aus: भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने दिली ‘या’ नव्या खेळाडूला संधी; पर्थ कसोटीसाठी केला संघ जाहीर
Maharashtra coach Sulakshan Kulkarni regretted the loss of victory sports news
निराशाजनक पराभवामुळे आव्हान खडतर! विजय निसटल्याची महाराष्ट्राचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांना खंत
Ranji Trophy Mumbai Crush Odisha By An Innings & 103 Runs
Ranji Trophy : शम्स मुलानीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने ओडिशाचा उडवला धुव्वा! एक डाव आणि १०३ धावांनी चारली धूळ
Australia A beat India A by 6 Wickets in in 2nd unofficial Test
IND A vs AUS A : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी भारताची उडाली दाणादाण, दुसऱ्या सराव सामन्यातही हार

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असे दुसऱ्यांदाच घडले –

न्यूझीलंडविरुद्धच्या बंगळुरू कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या पहिल्या डावात अशी लाजिरवाणी कामगिरी पाहायला मिळाली, ज्यामध्ये कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा अशी खेळी पाहायला मिळाली आहे, जेव्हा टॉप-८ पैकी ५ फलंदाज खातेही उघडू शकले नाहीत. याआधी १९८८ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील मँचेस्टर कसोटी सामन्यात हे पाहायला मिळाले होते.

हेही वाचा – Ind vs New: वर्ल्डकपच्या स्वप्नावर पाणी फेरणाऱ्या मॉट हेन्रीनेच दिला दणका; 5 विकेट्स आणि एक अफलातून झेल

भारताने नोंदवली मायदेशातील सर्वात निच्चांकी धावसंख्या –

भारताचा एकही फलंदाज मोठी खेळी साकारु शकला नाही, त्यामुळे घरच्या मैदानावर त्याच्या सर्वात निच्चांकी धावसंख्येची नोंद झाली आहे. याआधी १९७९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध भारत अवघ्या ७५ धावांत ऑलआऊट झाला होता. टीम इंडियाची ही एकूण तिसरी सर्वात निच्चांकी धावसंख्या आहे. २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत भारताची सर्वात निच्चांकी धावसंख्या होती, जेव्हा संघ ॲडलेडमध्ये कांगारू संघाविरुद्ध केवळ ३६ धावांवर गारद झाला होता. संघाची दुसरी सर्वात निच्चांकी धावसंख्या इंग्लंडविरुद्ध आली होती, जेव्हा संघ लॉर्ड्सवर अवघ्या ४२ धावांत गारद झाला होता. ४६ धावा ही भारतातील कोणत्याही संघाची कसोटीतील सर्वात निच्चांकी धावसंख्या आहे. भारताने दोन वर्षांपूर्वी न्यूझीलंडने केलेला विक्रम मोडला. २०२१ मध्ये वानखेडेवर किवी संघ ६२ धावांत गारद झाला होता. घरच्या मैदानावर भारताची ही सर्वात खराब कामगिरी आहे.

हेही वाचा – IND vs NZ : भारताचा ४६ धावांत खुर्दा; हेन्री-विल्यमसमोर लोटांगण

३७ वर्षांपूर्वी म्हणजेच १९८७ मध्ये दिल्लीत भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध ७५ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर न्यूझीलंडविरुद्ध भारताची ही सर्वात खराब धावसंख्या आहे. यापूर्वी १९७६ मध्ये टीम इंडियाने वेलिंग्टनमध्ये किवीजविरुद्ध ८१ धावा केल्या होत्या. ही भारताची कसोटीतील तिसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी २०२० मध्ये ॲडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघ ३६ धावांवर बाद झाला होता. त्याच वेळी, १९७४ मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध टीम इंडिया ४२ धावांवर ऑलआऊट झाली होती. हा कसोटीतील एकूण कोणत्याही संघाची १०वी निच्चांकी धावसख्या आहे