India vs England ICC Cricket World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या २९ व्या सामन्यात भारताचा सामना गतविजेत्या इंग्लंडशी होत आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत सुरू आहे. यंदाच्या विश्वचषकात इंग्लंडने आतापर्यंत काही विशेष कामगिरी केली नसली तरी, आजच्या सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजांनी दमदार पुनरागमन केलं आहे. इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारताला निर्धारित ५० षटकांत ९ बाद २२९ धावांवर रोखलं आहे. दरम्यान, या सामन्यात, भारतीय क्रिकेटपटू हातावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरले आहेत. सर्व भारतीय खेळाडूंनी हातावर ही पट्टी का बांधली आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. समाजमाध्यमांवरही याबाबत चर्चा सुरू आहे. अशातच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) याबाबतची माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एखाद्या दुःखद क्षणी किंवा दुःखद घटनेतील पीडितांना पाठिंबा दर्शवण्यासाठी खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरतात. आज रोहित शर्मा आणि कंपनी आपल्या हातावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरली आहे. भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांचं गेल्या आठवड्यात निधन झालं आहे. त्यामुळे बेदी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी भारतीय खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरले आहेत.

७० च्या दशकात भारतीय फिरकी आक्रमणाचा कणा म्हणून परिचित असणारे महान फिरकीपटू बिशन सिंग बेदी यांचं २३ ऑक्टोबर २०२३ रोजी निधन झालं. ते ७७ वर्षांचे होते. बिशन सिंग बेदी यांनी १९६७ ते १९७९ या काळात ६७ कसोटी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. आपल्या १३ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत त्यांनी २६६ बळी घेतले. तसेच नुकत्याच सुरू झालेल्या एकदिवसीय क्रिकेटमध्येही त्यांच्या नावावर सात बळी आहेत. भारताच्या पहिल्या वहिल्या एकदिवसीय सामन्यात बिशन सिंग बेदी यांच्या अद्भुत गोलंदाजीच्या जोरावर भारतानं विजय साकारला होता.

१२-८-६-१ : बिशन सिंग बेदींचा ऐतिहासिक स्पेल

१९७५ सालच्या विश्वचषक सामन्यामध्ये इस्ट आफ्रिका संघाविरुद्ध भारतीय संघ मैदानात उतरला होता. त्यावेळी बिशन सिंग बेदी यांच्या जादुई फिरकी गोलंदाजीमुळे इस्ट आफ्रिका संघाला १२० धावांवर रोखणं भारताला शक्य झालं. या सामन्यात बेदी यांनी १२ षटकांतली तब्बल ८ षटकं निर्धाव टाकली होती. उरलेल्या चार षटकांत सहा धावांच्या मोबदल्यात त्यांनी एक गडी बाद केला होता.