Tilak Verma and Suryakumar Yadav celebration : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना २५ जानेवारी रोजी चेन्नई येथे खेळला गेला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने हा सामना २ गडी राखून जिंकला. या सामन्याचा हिरो तिलक वर्मा ठरला, ज्याने दमदार अर्धशतकी खेळी साकारुन इंग्लंडला पराभवाची चव चाखायला लावली. त्याने शेवटपर्यंत फलंदाजी करत विजयी चौकार मारत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. या विजयानंतर सूर्याचा आणि तिलकचा एक खास व्हिडीओ व्हायरल होत आहे.

तिलक-सूर्याचा व्हिडीओ व्हायरल –

तिलक वर्माने विजयी चौकार मारल्यानंतर दमदार सेलिब्रेशन केले. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओ तिलकने विजयी चौकार मारल्यानंतर धावत जाऊन उंच उडी मारली. त्यानंतर स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या सर्व चाहत्यांना अभिवादन केले. त्याचबरोबर डावा हात कानाला लावला आणि उजव्या हाताने आकाशाकडे बोट केले. त्यानंतर समोरुन धावत आलेल्या सूर्याला पाहून त्याने वाकून नमन केले. यावेळी सूर्याने त्याला वाकून सलाम केला आणि टाळ्या वाजवून त्याचे कौतुक केले. शेवटी दोघांनी हसत-हसत एकमेकांची गळाभेट घेतली. ज्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

Ravi Bishnoi Reveals Inside Chat With Tilak Varma During Match Winning Partnership vs England
IND vs ENG: “तो सेट झाला होता आणि मी घाईघाईत…”, तिलक वर्मा-रवी बिश्नोईमध्ये अखेरच्या षटकांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Ajit pawar gives Sharad Pawar Health Update
Sharad Pawar Health Update: शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अजित पवारांची महत्त्वाची माहिती; म्हणाले, “त्यादिवशीच त्यांना…”
Tilak Varma Scores Most T20I Runs in Between Two Dismissals Broke Mark Chapman Record
IND vs ENG: तिलक वर्माने घडवला इतिहास, टी-२० मध्ये नाबाद राहत केल्या इतक्या धावा; ‘ही’ कामगिरी करणारा पहिला फलंदाज
IND vs ENG Tilak Varma reveals Head Coach Gautam Gambhir advice after Chennai T20I win
IND vs ENG : ‘काहीही झालं तरी…’, तिलक वर्माने विजयानंतर गौतम गंभीरने दिलेल्या गुरुमंत्राचा केला खुलासा
Minor boy arrested for killing infant G
१५ वर्षांचा प्रियकर, २२ वर्षांची प्रेयसी; चार महिन्यांचे बाळ आणि माणुसकीला काळीमा फासणारा गुन्हा…
Manohar Joshi Ashok Saraf
Padma Awards 2025 : महाराष्ट्रातील १४ दिग्गजांना पद्म पुरस्कार, वाचा संपूर्ण यादी
udayanraje Bhosle called chhava director laxman utekar
‘छावा’तील ‘ती’ दृश्ये बदलणार? उदयनराजेंनी थेट फोन केल्यावर दिग्दर्शक म्हणाले, “चित्रपटामध्ये फक्त आपले राजे…”

तिलकची ५५ चेंडूत ७२ धावांची खेळी निर्णायक खेळी –

इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना तिलक वर्माने भारताची धुरा यशस्वीपणे सांभाळली. एकीकडे भारताचे इतर फलंदाज मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरले. दुसरीकडे तिलकने भारताचे एक बाजू गंभीरपणे सांभाळली. त्याने इंग्लंडच्या सर्व गोलंदाजांचा धैर्याने सामना केला आणि सर्व गोलंदाजांविरुद्ध आक्रमक फटकेबाजी केली. त्याने ५५ चेंडूत ७२ धावांची खेळी साकारली. या दरम्यान तिलकने १३०.९१ च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली. त्याने ५ षटकार आणि ४ चौकार मारले.

वॉशिंग्टन सुंदरने तिलकला दिली साथ –

तिलक वर्माशिवाय वॉशिंग्टन सुंदरने १९ चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २६ धावांचे योगदान दिले. त्याचबरोबर नववा फलंदाज म्हणून आलेला रवी बिश्नोई पाच चेंडूंत नऊ धावा करून नाबाद माघारी परतला. इंग्लंडकडून ब्रायडेन कार्सेने तीन विकेट्स घेत संघाला विजयाकडे नेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण तिलकच्या खेळीसमोर त्याचे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर, मार्क वुड, आदिल रशीद, जेमी ओव्हरटन आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

तत्त्पूर्वी या सामन्यात सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने २० षटकात ९ बाद १६५ धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून जोस बटलरने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३० चेंडूत ४५ धावा केल्या. याशिवाय ब्रेडन कार्सने १७ चेंडूत ३१ धावांचे योगदान दिले. भारताकडून वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तसेच अर्शदीप सिंग, हार्दिक पंड्या, अभिषेक शर्मा, वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Story img Loader