IND vs ENG Suryakumar Yadav on Mohammed Shami : टीम इंडियाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखालील इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत शानदार सुरुवात केली आहे. भारताने बुधवारी कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात पाहुणा संघ इंग्लंडचा ७ गडी राखून पराभव केला. यासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
टीम इंडियाने या सामन्यात तीन फिरकीपटूंसह उतरली होती. ज्यामध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवण्यात आले होते. यावर सूर्या काय म्हणाला जाणून घेऊया. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी पहिल्या टी-२० सामन्यात न खेळल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले. अचानक या स्टार वेगवान गोलंदाजाची प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित झाला. मोहम्मद शमीने 2023 च्या विश्वचषक नंतर भारतासाठी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.
मोहम्मद शमीला प्लेइंग इलेव्हनमधून का बाहेर ठेवण्यात आले?
इंग्लंडविरुद्धच्या कोलकाता टी-२० मध्ये तो पुनरागमन करेल, अशी चाहत्यांना आशा होती, पण तसे झाले नाही. पहिल्या टी-२० सामन्यानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला, ‘आपल्या संघात अनुभवी गोलंदाज असणे नेहमीच चांगले असते. आम्हाला आमच्या ताकदीवर टिकून राहायचे होते. दक्षिण आफ्रिकेतही आम्ही असेच केले होते. हार्दिक पंड्याने नव्या चेंडूने गोलंदाजीची धुरा सांभाळली. त्यामुळे अतिरिक्त फिरकीपटू खेळण्यासाठी माझ्याकडे थोडी लवचिकता होती आणि ते तिघेही (वरुण, अक्षर आणि बिश्नोई) उत्तम कामगिरी करत आहेत.
या सामन्यासाठी केवळ एक स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगची निवड करण्याच्या निर्णयामुळे प्रशिक्षक आणि कर्णधा यांच्यावर टीका झाली होती, मात्र तीन फिरकी गोलंदाजांची निवड करण्याचा निर्णय योग्य ठरला. सूर्यकुमार यादव म्हणाला, “वरूण चक्रवर्तीची तयारी चांगली आहे आणि अर्शदीप अतिरिक्त जबाबदारी घेत आहे. आम्हाला थोडे वेगळे खेळायचे होते. गोलंदाजांनी एक योजना आखली आणि ती मैदानावर चांगल्या पद्धतीने अंमलात आणली. आम्ही ज्या पद्धतीने फलंदाजी केली ते म्हणजे सोन्याहून पिवळे होते. दक्षिण आफ्रिकेतही आम्ही असेच केले होते.”