IND vs ENG, World Cup 2023: भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतीमुळे सध्या बंगळुरूच्या एनसीएमध्ये उपचार घेत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात पांड्या बाहेर राहिला होता. त्याची अनुपस्थिती टीम इंडियाला खूप जाणवली. त्याचवेळी बीसीसीआयने पुढील सामन्यात पांड्याच्या उपलब्धतेबाबत एक मोठे अपडेट दिले आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या पायाला दुखापत झाली होती. घोट्याला दुखापत झाल्यानंतर तो थेट बंगळुरूला रवाना झाला. कुठे, त्याला एनसीएमध्ये ठेवण्यात आले आहे. ३० वर्षीय खेळाडूवर सध्या येथे उपचार सुरू आहेत.
हार्दिक पांड्याबाबत अपडेट देताना बीसीसीआयने त्यांच्या बदलीची घोषणा करण्याची कोणतीही योजना नसल्याचे म्हटले आहे. कारण इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी अष्टपैलू खेळाडू तंदुरुस्त होण्याची अपेक्षा आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पांड्याबद्दल सांगितले की, “हा फक्त पाय मुरगळला असून त्यात फारसे काहीही गंभीर नाही. त्यामुळे तो लखनऊमध्ये उपलब्ध असणार.”
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करताना हार्दिक पांड्याचा घोटा वळला होता. दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनलाही मधमाशी चावली होती, मात्र तो आता पूर्णपणे बरा आहे. भारतीय संघ सध्या विश्वचषक २०२३च्या गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे. भारताने पाचही सामन्यात पाच विजय मिळवत १० गुण मिळवले आहेत.
काय घडलं सामन्यामध्ये?
या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात सर्व १० गडी गमावून २७३ धावा केल्या. न्यूझीलंडकडून डॅरिल मिचेलने सर्वाधिक १३० धावा केल्या. रचिन रवींद्रने ७५ आणि ग्लेन फिलिप्सने २३ धावांचे योगदान दिले. या तिघांव्यतिरिक्त केवळ विल यंग (१७ धावा) दुहेरी आकडा गाठू शकला. भारताकडून मोहम्मद शमीने पाच आणि कुलदीप यादवने दोन गडी बाद केले. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
भारताकडून विराट कोहलीने ९५ धावांची खेळी खेळली. रोहित शर्माने ४६ आणि रवींद्र जडेजाने नाबाद ३९ धावा केल्या. श्रेयसने ३३, राहुलने २७ आणि गिलने २६ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्युसनने दोन विकेट्स घेतल्या. त्याचवेळी बोल्ट-हेन्री आणि सँटनर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. भारताने २७४ धावांचे लक्ष्य ४८व्या षटकात सहा गडी गमावून पूर्ण केले.
विश्वचषकासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, इशान किशन, के.एल. राहुल, हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.