भारत आणि इंग्लंडच्या महिला संघादरम्यान सुरु असणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेच्या पहिल्या सामन्यामध्ये भारताचा पराभव झाला. मिताली राज (७२ धावा) वगळता भारतीय संघातील कोणत्याही महिला फलंदाजाला फारश्या धावा करता आल्या नाहीत. ५० षटकांमध्ये भारताने ८ बाद २०१ धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरादाखल, सलामीवीर टॅमी ब्यूमाँट (नाबाद ८७) आणि उपकर्णधार नॅट शीव्हर (नाबाद ७४) यांनी तिसऱ्या गड्यासाठी ११९ धावांची भागीदारी रचून इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारतीय महिला संघाला आठ गडी आणि ९१ चेंडू राखून इंग्लंडने पराभूत केले. भारताचा या सामन्यात पराभव झाला असला तरी १७ वर्षीय शफाली वर्माने या सामन्यात पदार्पण केलं. शफाली क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत सर्वात कमी वयात पदार्पण करणारी भारतासाठी पहिल्या, तर विश्वातील पाचव्या क्रमांकाची खेळाडू ठरली आहे. या कमी वयातील पदार्पणासोबतच शफाली अन्य एका कारणामुळे चर्चेत राहिली ती म्हणजे सामना थेट प्रक्षेपित करताना स्क्रीनवर दाखवण्यात आलेलं तिचं वय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की वाचा >> क्वारंटाइनमध्ये असणाऱ्या पृथ्वीच्या बेडवर दिसली अशी वस्तू की चाहत्यांनी केलं ट्रोल

पदार्पणाच्या सामन्यातच शफालीने आपल्या हटके फलंदाजीची झलक दाखवली. पहिल्या पाच षटकांमध्ये तीन सुंदर चौकार लगावले. मात्र ती मैदानावर असतानाच स्काय स्फोर्ट्स आणि भारतामध्ये प्रक्षेपण करणाऱ्या सोनी टेनने शफालीचं वय १७ ऐवजी थेट २८ दाखवलं. शफालीचं वय ११ वर्षांनी अधिक दाखवल्यामुळे नेटकऱ्यांनी थेट प्रक्षेपण करणाऱ्या वाहिन्यांची चांगलीच फिरकी घेतल्याचं चित्र ट्विटरवर पहायला मिळालं. पाहुयात याचसंदर्भातील काही व्हायरल ट्विटस…

१) काय ती १७ वर्षांची आहे टीव्हीवर तर २८ दाखवलं…

२) मी गुगल केलं…

३) १७ रे २८ नाही

४) आहे १७ दाखवलं २८

५) ‘सोनी’वाले दारु पिऊन हे दाखवतायत का?

६) काय गोंधळ आहे राव…

७) वयाच्या २८ व्या वर्षी पदार्पण केलं म्हणे…

८) त्यांनी २८ वय दाखवलं

९) .. म्हणून दाखवलं असेल २८

१०) तुमच्या माहितीसाठी…

११) २८ कसं वय?

१२) ती १७ ची आहे २८ ची नाही

१३) घ्या पुरावा…

१४) सोनीकडूनही झालेली चूक

१५) ‘स्काय क्रिकेट’वाल्यांनो ती २८ नाही १७ वर्षांची आहे

दरम्यान, शफाली १४ चेंडू खेळून बाद झाली. तरी कर्णधार मिताली राजने तिचं कौतुक केलं आहे. वयाच्या १७ व्या वर्षी शफाली ज्यापद्धतीने न घाबरता आपला नैसर्गिक खेळ खेळली ते कौतुकास्पद असल्याचं मितालीने सांगितलं.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs eng womens odi fans troll broadcasters for goofing up about shafali verma age scsg