IND vs ENG Yuvraj Singh praises Abhishek Sharma Innings : भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माने इंग्लंडविरुद्ध आपल्या तुफानी फलंदाजीने खळबळ उडवून दिली. टीम इंडियासाठी अभिषेकने अवघ्या ५४ चेंडूत १३५ धावांची दमदार खेळी केली. यादरम्यान त्याने अवघ्या ३७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या खेळीत अभिषेक शर्माने १३ षटकार आणि ७ चौकार लगावले. अभिषेक शर्माची ही खेळी पाहून त्याचा गुरू युवराज सिंग खूप खुश झाला. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत अभिषेकचे कौतुक केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

युवराज सिंगकडून अभिषेकचे कौतुक –

याआधी युवराज सिंगने अभिषेक शर्माच्या फलंदाजीबाबत सोशल मीडियावर अनेकवेळा उघडपणे उणीवा सांगितल्या होत्या. मात्र, यावेळी त्याने या युवा फलंदाजाचे मनापासून कौतुक केले. युवराज सिंगने एक्सवर लिहिले, ‘खूप छान अभिषेक शर्मा, मला तुझ्याकडून हेच ​​बघायचे होते. मला तुझा अभिमान आहे.’

अभिषेकच्या वादळी खेळीने जिंकली सर्वांची मनं –

अभिषेक शर्माच्या या दमदार शतकी खेळीमुळे टीम इंडियाने पाचव्या सामन्यात इंग्लंडवर १५० धावांनी विजय मिळवला. या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करत ९ बाद २४७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या संघानेही दमदार सुरुवात केली होती, मात्र नंतर भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त पुनरागमन केले. ज्यामुळे इंग्लंडचे फलंदाज ठराविक अंतराने विकेट्स पडत राहिल्या. त्यामुळे पाहुणा संघ ९७ धावांवर गारद झाला.

इंग्लंडकडून फिल सॉल्टने २३ चेंडूत सर्वाधिक ५५ धावांची खेळी केली. याशिवाय इंग्लंडसाठी इतर कोणत्याही फलंदाजाला खास कामगिरी करता आली नाही. दुसरीकडे मोहम्मद शमीने पुनरागमन तीन विकेट्स घेतल्या. शमीशिवाय अभिषेक शर्मा, शिवम दुबे आणि वरुण चक्रवर्ती या तिघांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, तर रवी बिश्नोईने एका फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला.