INDvsHKG, Asia Cup 2022 : आशिया चषक स्पर्धेत भारताने हाँगकाँगवर ४० धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने हाँगकाँगसमोर विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र ही धावसंख्या गाठताना हाँगकाँगच्या फलंदाजांची दमछाक झाली. मात्र हार न मानता हाँगकाँगने समाधानकारक खेळी केली. या विजयासह भारताने सुपर-४ मध्ये आपले स्थान कायम केले आहे. भारताच्या आजच्या विजयाचे खरे शिल्पकार सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली ठरले. दोघांनीही नाबाद अर्धशतकी खेळी करत हाँगकाँगसमोर धावांचा डोंगर उभा केला.

हेही वाचा >>> अखेर दुष्काळ संपला! विराट कोहलीच्या बॅटमधून धावांचा पाऊस, झळकावले दमदार अर्धशतक

भारताने दिलेल्या १९३ धावांचे लक्ष्य गाठताने हाँहकाँग संघाची दमछाक झाली. सलामीला आलेले निझाकत खान (१०), यासीम मुर्तझा (९) स्वस्तात बाद झाले. त्यानंतर बाबर हयातने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला मात्र रवींद्र जडेजाच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. त्याने ३५ चेंडूंमध्ये ४१ धावा केल्या. त्यानंतर एजाज खान (१४), शिशान अली (२६, नाबाद) यांनी संघासाठी धावा करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात ते अपयशी ठरले. हाँगकाँगला २० षटकांमध्ये १५२ धावा करता आल्या.

हेही वाचा >>> अफगाणिस्तानच्या आगामी सामन्याआधी उमर गुलच्या पत्नीने केली खास विनंती, म्हणाली “पाकिस्तानविरोधात…”

याआधी हाँगकाँगने नाणेफेक जिंकल्यानंतर अगोदर गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या भारताने धमाकेदार कामगिरी केली. भारताचे विराट कोहली (५९) आणि सूर्यकुमार यादव (६८) चांगलेच तळपले. त्यांनी नाबाद अर्धशतकी खेळी करत भारताचा धावफलक १९२ धावांवर नेऊन ठेवला. तर याआधी रोहित शर्मा (२१) आणि केएल राहुल (३६) यांनी समाधानकारक कामगिरी केली. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करताना ते झेलबाद झाले. भारताने वीस षटकांत दोन गडी गमावून १९२ धावा केल्या.

हेही वाचा >>> क्रिकेटचा देव पुन्हा एकदा बॅट हातात घेणार, सचिन तेंडुलकर ‘या’ क्रिकेट स्पर्धेत खेळण्याची शक्यता

हाँगकाँगचे गोलंदाज भारतीय फलंदाजांना रोखू शकले नाही. सूर्यकुमार यावने तर षटकार आणि चौकार यांचा पाऊस पाडत अवघ्या २६ चेंडूंमध्ये ६८ धावा केल्या. त्याने सहा चौकार आणि सहा षटकार लगावले. आयुष शुक्ला, मोहम्मद गझनफर यांनी प्रत्येक एका भारतीय फलंदाजाला बाद केले. त्यानंतर हाँगकाँगच्या एकाही गोलंदाजाला भारतीय फलंदाजांना रोखता आले नाही.