IND vs IRE Playing 11: जवळपास एक वर्ष मैदानापासून दूर राहिल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या जसप्रीत बुमराहच्या फॉर्म आणि फिटनेसवर बीसीसीआयच्या निवड समितीसह सर्वच भारतीय चाहत्यांचे लक्ष असणार आहे. शुक्रवारपासून आयर्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत तो भारतीय क्रिकेट संघाचे बुमराह नेतृत्व करेन. भारत आणि आयर्लंड यांच्यातील पहिला टी२० सामना शुक्रवार, १८ ऑगस्ट रोजी मलाहाइड क्रिकेट क्लबमध्ये खेळवला जाईल. संध्याकाळी ७.३० वाजता सामन्याला सुरुवात होतील.

वेस्ट इंडिजविरुद्ध टी२० मालिका गमावल्यानंतर भारतीय संघावर माजी क्रिकेटपटूंसह चाहत्यांच्याही टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे त्याची भरपाई म्हणून टीम इंडिया या मालिकेत नक्कीच चांगली कामगिरी करून यश संपादन करण्याचा प्रयत्न करेल. भारतीय फलंदाजीबाबत बोलायचे झाल्यास, फक्त तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी विंडीज मालिकेत अनुक्रमे १७३ आणि १६६ धावा करत चांगली कामगिरी केली होती. त्यांच्या व्यतिरिक्त एकही फलंदाज संपूर्ण मालिकेत सातत्य दाखवू शकला नाही. त्यामुळे आयर्लंड मालिका म्हणजे त्यांना ही शेवटची संधी असणार आहे. युवा रिंकू सिंग आणि जितेश शर्मा यांचा प्रथमच टी२० संघात समावेश करण्यात आला आहे, त्यांचा प्लेईंग ११मध्ये खेळण्याची संधी मिळते का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

IND vs AUS 3rd Test Match Timing Date Venue What Time Does the Gabba Test Start
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया गाबा कसोटी पहाटे किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या योग्य वेळ
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
IND vs AUS 3rd Test Rain to Play Spoilsport in Brisbane Weather Update India WTC Qualification
IND vs AUS: ब्रिस्बेनमधील पाऊस आणणार भारताच्या WTC फायनलच्या शर्यतीत अडथळा, गाबा कसोटी रद्द झाली तर काय होणार?
INDW vs AUSW Arundhati Reddy Dismissed Top 4 Batters of Australia Top Order Becomes
INDW vs AUSW: अरूंधती रेड्डीचा ऐतिहासिक पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी पहिली भारतीय गोलंदाज
WTC Final Qualification Scenario How Team India Can Qualify After Falling Behind South Africa and Australia
WTC Qualification Scenario: टीम इंडिया आफ्रिका-ऑस्ट्रेलियाने मागे टाकल्यानंतर WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? कसं आहे समीकरण
Australia Beat India by 10 Wickets in Pink Ball Test Pat Cummins 5 Wickets Nitish Reddy 42 Runs Inning
IND vs AUS: पिंक बॉल कसोटीत ऑस्ट्रेलियाची बाजी; भारतावर १० विकेट्सनी दणदणीत विजय
England Beat New Zealand by 323 Runs in 2nd Test and win Series Joe Root Harry Brook Century
NZ vs ENG: न्यूझीलंडचा मोठा पराभव! टीम इंडियाला चीतपट करणाऱ्या किवींची घरच्या मैदानावर इंग्लंडसमोर शरणागती
IND vs AUS 2nd Test Day 2 Highlights Only Twice Any Team Win Day Night Test After Conceding First Innings Lead
IND vs AUS: ॲडलेड कसोटीत भारताची स्थिती बिकट, दुसऱ्या दिवशी निम्मा संघ तंबूत; ‘हा’ रेकॉर्ड पाहता पराभव टाळणं कठीण

जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाकडे सर्वांचे लक्ष आहे

भारतीय संघात आयपीएल स्टार ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंग आणि जितेश शर्मा आहेत पण सर्वांच्या नजरा जसप्रीत बुमराहवर असतील. २९ वर्षीय बुमराहला गेल्या वर्षी टी२० विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मायदेशातील मालिकेदरम्यान पाठीत स्ट्रेस फ्रॅक्चर झाला होता, त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तब्बल दीड वर्षानंतर तो आता भारतीय संघात पुनरागमन करणार आहे. त्यामुळे राहुल द्रविड, रोहित शर्मासह बीसीसीआय देखील त्याच्या या कामगिरीकडे लक्ष ठेवून असणार आहे.

हेही वाचा: IND vs IRE T20: भारत आणि आयर्लंड मालिकेतील सामने, जाणून घ्या विनामूल्य कुठे आणि कधी पाहू शकता?

आयर्लंड दौऱ्यावर त्याला पाच दिवसांत तीन सामन्यांत जास्तीत जास्त १२ षटके टाकावी लागतील. या मालिकेतून बीसीसीआयचा मुख्य निवडकर्ता अजित आगरकर, एकदिवसीय कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना मॅच फिटनेसच्या बाबतीत बुमराहची सद्य स्थिती काय आहे याचा अंदाज येईल. ५० षटकांचे स्वरूप मात्र पूर्णपणे वेगळे आहे कारण त्यांना दोन, तीन किंवा चार षटकांच्या स्पेलमध्ये दहा षटके टाकावी लागतात. त्यामुळे त्याचा वेग, फॉर्म आणि फिटनेस या तीन बाबींचा प्रामुख्याने विचार केला जाईल.

बीसीसीआयने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर बुमराहच्या गोलंदाजीचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो शॉर्ट बॉल आणि यॉर्कर टाकत आहे. सामन्याची परिस्थिती मात्र पूर्णपणे वेगळी असेल आणि संघ व्यवस्थापनाने आधीच त्याला ऑस्ट्रेलियात झालेल्या टी२० विश्वचषकापूर्वीच्या मालिकेत खेळवून घाई केली होती. अशी आता चूक बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापन करणार नाही.

रिंकू सिंग आणि जितेश शर्मा डेब्यू करू शकतात

आशिया चषक आणि आयसीसी विश्वचषक यांसारख्या मोठ्या स्पर्धांपूर्वी वर्कलोड मॅनेजमेंट करण्याची गरज लक्षात घेता, अनेक खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. आपल्या उदयोन्मुख कौशल्यांच्या जोरावर आयर्लंडवर आपले वर्चस्व कायम राखण्याचे भारताचे लक्ष्य असेल. जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन वगळता सध्याच्या भारतीय संघात अनेक युवा चेहरे दिसणार आहेत. आयपीएलमधील स्टार रिंकू आणि जितेश भारताकडून त्यांना टी२०त पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. दुसरीकडे, शिवम दुबेला संघात खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. प्रसिद्ध कृष्णाही बुमराहप्रमाणे पुनरागमन करत आहे. बंगळुरूच्या या वेगवान गोलंदाजाला कंबरेच्या फ्रॅक्चरमधून सावरण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागली.

भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यातील टी२० सामन्यांची आकडेवारी

हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये, भारत आणि आयर्लंड टी२० आंतरराष्ट्रीय मध्ये पाच वेळा आमनेसामने आले आहेत. भारताने ५ सामने जिंकले आहेत तर आयर्लंडला भारताविरुद्ध अद्याप एकही विजय नोंदवता आलेला नाही. गेल्या वर्षीही भारताने दोन सामन्यांच्या मालिकेत आयर्लंडचा २-० असा पराभव केला होता.

आयर्लंड संघ कडवी टक्कर देऊ शकतो

आयसीसी पुरुष टी२० क्रिकेट विश्वचषक २०२४ मध्ये आपले स्थान निश्चित केल्यानंतर आयर्लंड भारताशी दोन हात करणार आहे. या मालिकेत ते आपली लय कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील. आयर्लंड टी२० संघासाठी थिओ व्हॅन व्होरकोमला प्रथमच बोलावण्यात आले आहे. भारताविरुद्धच्या टी२० आंतरराष्ट्रीय मध्ये, हॅरी टेक्टर आयर्लंडसाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, त्याने दोन सामन्यांमध्ये एकूण १०३ धावा केल्या आहेत. गोलंदाजीत क्रेग यंगने दोन सामन्यांत १३.२५ च्या सरासरीने चार बळी घेतले आहेत.

हेही वाचा: विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा : गुकेश,विदितचे आव्हान संपुष्टात; प्रज्ञानंद-अर्जुन लढत ‘टायब्रेकर’मध्ये

IND वि IRE सर्वोच्च आणि सर्वात कमी धावसंख्या

आयर्लंड:

T20I मध्ये भारताविरुद्ध आयर्लंडची सर्वोच्च धावसंख्या २२१/५ आहे, तर त्यांची सर्वात कमी धावसंख्या ७० आहे.

भारत:

आयर्लंडविरुद्ध भारताची सर्वोच्च धावसंख्या २२५/७ आहे, तर त्यांची सर्वात कमी धावसंख्या ११३/३ आहे.

दोन्ही संघाची संभाव्य प्लेईंग ११:

भारतीय संघ: ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह (कर्णधार), मुकेश कुमार.

आयर्लंड संघ: पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्र्यू बालबर्नी, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, मार्क अडायर, बॅरी मॅककार्थी, जोशुआ लिटल, बेन व्हाइट, क्रेग यंग.

Story img Loader