IND vs IRE Playing 11: जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची नजर रविवारी (२० ऑगस्ट) आयर्लंडविरुद्धची दुसरी टी२० जिंकून मालिका विजयावर असेल. ११ महिन्यांनंतर पुनरागमन करणाऱ्या भारताने बुमराहच्या दमदार कर्णधार आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर पावसाने प्रभावित झालेल्या पहिल्या सामन्यात आयर्लंडचा २ धावांनी निसटता पराभव केला. या मालिकेपूर्वी भारताने आयर्लंडविरुद्धचे पाचही टी२० सामने जिंकले होते आणि या मालिकेतही टीम इंडियाचा विक्रम कायम ठेवण्याकडे लक्ष असेल.

बुमराहने पहिल्याच षटकात २ विकेट्स घेतल्याने भारताने आयर्लंडला २० षटकात ७ बाद १३९ धावांवर रोखले. यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांनी ४६ धावांची भागीदारी करून भारताला चांगली सुरुवात करून दिली, पण भारताचा डाव ६.५ षटकांत ४९/२ अशी आटोपल्यानंतर पावसामुळे सामना पुन्हा खेळता आला नाही, त्यामुळे टीम इंडियाच्या मधल्या फळीला फलंदाजी करायची संधीच मिळाली नाही.

Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
AUS vs PAK Pakistan won the ODI series in Australia after 22 years
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनी नोंदवला ऐतिहासिक विजय, भारताला मागे टाकत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई संघ
IND vs SA Ryan Rickelton's 104 Metre Six man ran away with ball video viral
IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल
India vs South Africa 2nd T20 Highlights in Marathi
IND vs SA 2nd T20I Highlights : रोमांचक सामन्यात यजमानांनी हिरावला भारताच्या तोंडचा घास, ट्रिस्टन स्टब्सच्या वादळी खेळीने फेरले वरुण चक्रवर्तीच्या मेहनतीवर पाणी
AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी
Sanju Samson breaks Dhoni record to become joint 7th Indian batter
Sanju Samson : संजू सॅमसनने धोनीला मागे टाकत केला खास पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला सातवा भारतीय
IND vs SA India National Anthem Witnesses Technical Glitch Ahead Of 1st T20I vs South Africa
IND vs SA सामन्यापूर्वी अचानक काही सेकंदात बंद झाले भारताचे राष्ट्रगीत, मग पुढे काय झालं? जाणून घ्या

रिंकू, शिवम दुबे, तिलक वर्मा यांच्याकडून दुसऱ्या टी२० मध्ये फलंदाजीसह दमदार कामगिरीची अपेक्षा

दुसरा टी२० सामना पूर्ण खेळला जाईल अशी आशा दोन्ही संघांना असेल. दुसऱ्या टी२० मध्ये यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे, रिंकू सिंग, ऋतुराज गायकवाड आणि तिलक वर्मा यांसारख्या अनेक युवा फलंदाजांची अफलातून फलंदाजी पाहता येतील. रिंकूने पहिल्या टी२० मधून भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. दुसरीकडे, वेस्ट इंडिज दौऱ्यावर छाप पाडणारा तिलक वर्मा आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी२०मध्ये शून्यावर परतला असला तरी दुसऱ्या टी२०मध्ये त्याच्याकडून दमदार खेळी अपेक्षित आहे.

पहिल्या टी२० मध्ये जैस्वालने २४ आणि गायकवाडने १९ धावांची छोटी पण चांगली खेळी खेळली होती. या दोघांकडून दुसऱ्या टी२०मध्ये मोठ्या धावसंख्येची अपेक्षा असेल. भारतीय संघाचा सध्याचा टॉप ऑर्डर युवा फलंदाजांनी भरलेला आहे आणि या संघात संजू सॅमसन सर्वात अनुभवी आहे. सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पांड्यासारख्या अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत या यष्टीरक्षक फलंदाजांनी भारतीय संघाच्या फलंदाजीच्या क्रमवारीतील अनुभवाच्या अभावावर बऱ्याच अंशी मात केली. वेस्ट इंडिज दौऱ्यावर फ्लॉप ठरलेल्या सॅमसनला संघातील आपली दावेदारी मजबूत करण्याची ही शेवटची संधी असेल.

हेही वाचा: Virat Kohli: २००८ ते २०२३ अन् to be continued…, विराटच्या कारकिर्दीची ही १५ वर्षे देतात त्याच्या परिवर्तनाची साक्ष, पाहा photos

भारतीय गोलंदाजांकडून आणखी एका दमदार कामगिरीची अपेक्षा

जवळपास वर्षभरानंतर पुनरागमन करणाऱ्या बुमराहने पहिल्याच सामन्यात २ विकेट्स घेत शानदार सुरुवात केली. भारताचा टी२० कर्णधार म्हणून बुमराहचे हे पदार्पण होते आणि त्याने ४ षटकांत २४ धावांत २ गडी बाद करत टी२० कर्णधारपदाच्या पदार्पणातच सामनावीर ठरणारा पहिला भारतीय ठरला. बुमराहने त्याच्या स्पेलमध्ये नऊ डॉट चेंडू टाकले आणि त्याला टी२० पदार्पण करणारा वेगवान गोलंदाज प्रसाद कृष्णाने समर्थपणे पाठिंबा दिला, ज्याने २ विकेट्स घेत ३२ धावा दिल्या. भारताकडून एकदिवसीय सामने खेळणारा कृष्णाही दुखापतीमुळे दीर्घकाळानंतर या सामन्यातून संघात परतला. बुमराह आणि कृष्णा यांचे आव्हान दुसऱ्या टी२० मध्येही पेलणे आयर्लंडच्या फलंदाजांसाठी सोपे नसेल.

आयर्लंडच्या फलंदाजांना पुनरागमन करण्यासाठी ताकद दाखवावी लागणार आहे

पहिल्या टी२० मध्ये पहिल्याच षटकात दोन विकेट गमावल्याने आयरिश फलंदाज पूर्णपणे बॅक फुटवर गेले होते. मॅककार्थी (५१) आणि कॅम्पफर (३९) नसता तर आयर्लंडला १३९ धावांपर्यंत पोहोचणे फार कठीण झाले असते. आयरिश संघाला मालिका वाचवायची असेल, तर त्यांच्या फलंदाजांना मोठी कामगिरी करावी लागेल. बुमराहने ज्या प्रकारे टीम इंडियाचे नेतृत्व केले, उदाहरणार्थ अनुभवी आयरिश कर्णधार पॉल स्टर्लिंगला तेच करावे लागेल. यासोबतच अँड्र्यू बालबर्नी, जोशुआ लिटल, क्रेग यंग आणि जॉर्ज डॉकरेल या खेळाडूंनाही त्यांच्या संघासाठी जोर लावावा लागणार आहे.

कसे असेल हवामान आणि खेळपट्टी?

डब्लिनमधील ढगाळ वातावरण वेगवान गोलंदाजांसाठी नक्कीच उपयुक्त ठरले. अशा परिस्थितीत नाणेफेक खूप महत्त्वाची ठरते, जी भारताने पहिल्या टी२० मध्ये जिंकली आणि आयर्लंडला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दुसऱ्या टी२० मध्येही पावसाची शक्यता आहे आणि अशा परिस्थितीत नाणेफेकही खूप महत्त्वाची असेल.

हेही वाचा: Virat Kohli: वर्ल्डकपपूर्वी विराट कोहलीला मिळणार डायमंड बॅट, किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क; जाणून घ्या

भारत वि आयर्लंड टी२० मालिका २०२३ संघ

भारतीय संघ: जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शिवम दुबे, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, शाहबाज अहमद, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार, रवी बिश्नोई.

आयर्लंड संघ: पॉल स्टर्लिंग (कर्णधार), लॉर्कन टकर (विकेटकीपर), मार्क अडायर, रॉस अडायर, अँड्र्यू बालबर्नी, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, फिओन हँड, जोश लिटल, बॅरी मॅकार्थी, हॅरी टेक्टर, बेन व्हाइट, थिओ व्हॅन व्होरकोम, क्रेग यंग.