India vs Ireland T20 series: जवळपास वर्षभर संघापासून दूर राहिल्यानंतर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. बुमराहला आयर्लंड दौऱ्यासाठी कर्णधार बनवण्यात आले आहे. १८ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यावर टीम इंडिया तीन सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. दुसरा सामना २० ऑगस्टला आणि तिसरा सामना २३ ऑगस्टला होणार आहे. जसप्रीत बुमराह सप्टेंबर २०२२मध्ये भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. तेव्हापासून तो बॅक स्ट्रेस फ्रॅक्चरच्या दुखापतीमुळे टीम इंडियापासून दूर होता. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणाऱ्या विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची ही शेवटची टी२० मालिका असेल. मात्र, या मालिकेपूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.

द्रविड आणि लक्ष्मण आयर्लंड दौऱ्यावर जाणार नाहीत

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बुमराहच्या नेतृत्वाखालील संघ १५ ऑगस्टला डब्लिन, आयर्लंडला रवाना होईल. या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेसाठी मुख्य राहुल द्रविडला या दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. अशा परिस्थितीत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे अध्यक्ष व्हीव्हीएस लक्ष्मण यांना संघासोबत पाठवण्याचा प्रस्ताव समोर आला होता. मात्र, आता लक्ष्मणही संघासोबत जाणार नसल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये बोलले जात आहे. द्रविड सध्या अमेरिकेत भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यात व्यस्त आहे. वेस्ट इंडिजचा दौरा १३ ऑगस्टला संपणार आहे. या दौऱ्यावर गेलेल्या काही खेळाडूंचाही आयर्लंड दौऱ्यासाठी संघात समावेश आहे.

‘या’ खेळाडूला प्रशिकपदाची दिली जाणार जबाबदारी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, द्रविड आणि लक्ष्मण यांच्या अनुपस्थितीत एनसीएचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांना मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी दिली जाऊ शकते. त्याचवेळी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून साईराज बहुतुले त्यांच्यासोबत उपस्थित राहणार आहेत. टीम इंडियाचा माजी लेगस्पिनर साईराज सध्या एनसीएमध्ये गोलंदाजी प्रशिक्षक आहे. बुमराहच्या नेतृत्वाखालील संघासह दोघेही मंगळवारी डब्लिनला रवाना होण्याची शक्यता आहे. बुमराह त्याच्या कारकिर्दीत दुसऱ्यांदा भारतीय संघाची धुरा सांभाळणार आहे. तत्पूर्वी, त्याने जुलै २०२२ मध्ये इंग्लंडविरुद्ध पुन्हा शेड्यूल केलेल्या पाचव्या कसोटीचे नेतृत्व केले. मात्र, बुमराह प्रथमच टी२० मध्ये कर्णधारपद भूषवणार आहे.

हेही वाचा: Shubman Gill: “जर शुबमन गिल लवकर फॉर्मात आला नाही तर टीम इंडियासाठी…”, माजी खेळाडूने दिली धोक्याची सूचना

वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेलेल्या संघातून या खेळाडूंची निवड करण्यात आली होती

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० मालिकेत सहभागी झालेले मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल आणि तिलक वर्मा यांना केवळ आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत संधी देण्यात आली आहे. भारताचे नियमित टी२० संघाचे सदस्य हार्दिक पांड्या, शुबमन गिल, रवींद्र जडेजा, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज हे आयर्लंड दौऱ्यावर संघाचा भाग नाहीत.

आशिया चषक आणि विश्वचषक पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. आशिया चषक ३० ऑगस्टपासून सुरू होत आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या वरिष्ठ खेळाडूंचीही पुन्हा एकदा टी२० संघात निवड झालेली नाही. रोहित आणि विराटने २०२२ च्या टी२० विश्वचषकानंतर भारतासाठी एकही टी२० सामना खेळलेला नाही.

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या संघात समाविष्ट असलेल्या बहुतांश खेळाडूंची निवड करण्यात आली

याशिवाय चीनमधील हांगझोऊ येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी टीम इंडियामध्ये समाविष्ट असलेल्या बहुतांश खेळाडूंना आयर्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेत संधी देण्यात आली आहे. या दौऱ्यावर ऋतुराज गायकवाड टीम इंडियाचा उपकर्णधार आहे, तर आशियाई क्रीडा स्पर्धेत तो टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. त्याचवेळी यशस्वी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा, शिवम दुबे, वॉशिंग्टन, शाहबाज, रवी बिश्नोई, अर्शदीप, मुकेश आणि आवेश हे देखील आशियाई क्रीडा स्पर्धेत टीम इंडियाचा भाग आहेत.

हेही वाचा: Kane Williamson: न्यूझीलंडला मोठा धक्का! आगामी विश्वचषकातून केन विलियम्सन होऊ शकतो बाहेर, फिटनेसबाबत आली अपडेट

आयर्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघ

जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, कृष्णा, रवी बिश्नोई, प्रसिद्ध अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान.

आयर्लंड विरुद्ध भारत टी२० मालिकेचे वेळापत्रक

१८ ऑगस्ट: पहिला टी२० सामना (मलाहाइड)

२० ऑगस्ट: दुसरी टी२० सामना (मलाहाइड)

२३ ऑगस्ट: तिसरा टी२० सामना (मलाहाइड)