IND vs IRE Live Score Updates : भारतीय टी २० संघ सध्या आयर्लंड दौऱ्यावर गेला आहे. भारत आणि यजमान संघात दोन सामन्यांची टी २० मालिका खेळवली जाणार आहे. यातील पहिला सामना आज (२६ जून) डबलिनमधील ‘द व्हिलेज स्टेडियम’वर झाला. हा सामना भारताने सात गडी राखून जिंकला. आयपीएल विजेता कर्णधार हार्दिक पंड्याकडे भारतीय टी २० संघाचे नेतृत्व देण्यात आले होते. कर्णधार पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पावसाच्या व्यत्ययामुळे दोन्ही डावांतील ८-८ षटके कमी करण्यात आली होती. यजमान आयर्लंडने हॅरी टेक्टरच्या अर्धशतकाच्या बळावर तीन बाद १०८ धावांपर्यंत मजल मारली होती.

Live Updates
01:12 (IST) 27 Jun 2022
कर्णधार हार्दिक पंड्या बाद

कर्णधार हार्दिक पंड्या बाद २४ धावा करून बाद झाला. जोशुआ लिटिलच्या गोलंदाजीवर तो पायचित झाला.

00:46 (IST) 27 Jun 2022
सूर्यकुमार यादव शून्यावर बाद

भारताचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव शून्यावर बाद झाला. क्रेगने यंगने त्याला बाद केले.

00:43 (IST) 27 Jun 2022
भारताला पहिला झटका

भारताचा सलामीवीर ईशान किशन २६ धावा करून बाद झाला. किशन बाद झाल्यांतर सुर्यकुमार यादव मैदानात आला आहे.

00:31 (IST) 27 Jun 2022
भारतीय फलंदाजीला सुरुवात

आयर्लंडने दिलेले १०९ धावांचे आव्हान पार करण्यासाठी भारताचे सलामीवर ईशान किशन आणि दीपक हुड्डा मैदानावर दाखल झाले आहेत.

00:14 (IST) 27 Jun 2022
हॅरी टेक्टरचे अर्धशतक पूर्ण

आयर्लंडचा फलंदाज हॅरी टेक्टरने शानदार अर्धशतक पूर्ण केले. त्याने २९ चेंडूत ५० धावांचा टप्पा ओलांडला.

00:06 (IST) 27 Jun 2022
आयर्लंडचा चौथा गडी बाद

युझवेंद्र चहलने लोर्कन टकरला १८ धावांवर माघारी धाडले. अक्षर पटेलने सीमारेषेजवळ त्याचा झेल टिपला.

23:42 (IST) 26 Jun 2022
गॅरेथ डेलानीच्या रुपात यजमानांना तिसरा झटका

आवेश खानच्या गोलंदाजीवर गॅरेथ डेलानी बाद झाला. आयर्लंडची अवस्था तीन २२ अशी झाली आहे.

23:30 (IST) 26 Jun 2022
यजमानांना दुसरा झटका

सलामीवीर पॉल स्टर्लिंग अवघ्या चार धावा करून बाद झाला. भारतीय कर्णधार हार्दिक पंड्याने दीपक हुड्डाकरवी त्याला बाद केले.

23:26 (IST) 26 Jun 2022
आयर्लंडचा सलामीवर माघारी

कर्णधार अँड्रयू बालबर्नी खातेही न खोलता बाद झाला. भुवनेश्वर कुमारने त्याला बाद केले.

23:21 (IST) 26 Jun 2022
यजमान आयर्लंडच्या फलंदाजीला सुरुवात

पावसाच्या अडथळ्यानंतर सरतेशेवटी सामन्याला सुरुवात झाली आहे. आयर्लंडची फलंदाजी सुरू झाली आहे.

23:04 (IST) 26 Jun 2022
१२-१२ षटकांचा होणार सामना

पावसामुळे भारत आणि आयर्लंड यांच्यातील सामना कमी षटकांचा खेळवला जाणार आहे. दोन्ही बाजूची प्रत्येकी ८-८ षटके कमी करण्यात आली आहेत.

21:10 (IST) 26 Jun 2022
डबलिनमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात

द व्हिलेज क्रिकेट स्टेडियममध्ये पुन्हा पावसाला सुरुवात झाल्यामुळे सामना सुरू होण्यास उशीर झाला आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

20:54 (IST) 26 Jun 2022
उमरान मलिकचे भारतीय संघाकडून पदार्पण

भारतीय संघ - ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, हार्दिक पंड्या (कर्णधार), दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, अवेश खान, उमरान मलिक, युझवेंद्र चहल.

आयर्लंड संघ - पॉल स्टर्लिंग, अँड्रयू बालबर्नी (कर्णधार), गॅरेथ डेलानी, हॅरी टेक्टर, लोर्कन टकर (यष्टिरक्षक), अँडी मॅकब्राईन, जॉर्ज डॉकरेल, मार्क अडायर, बॅरी मॅकार्थी, जोशुआ लिटील, कोनोर ऑल्फर्ट

20:45 (IST) 26 Jun 2022
नाणेफेक जिंकून भारताचा गोलंदाजीचा निर्णय

भारतीय कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्यावतीने उमरान मलिक आजच्या सामन्यात पदार्पण करणार आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

20:31 (IST) 26 Jun 2022
पहिल्या सामन्यावर पावसाचे सावट

भारत आणि आयर्लंड दरम्यान होणाऱ्या पहिल्या टी २० सामन्यावर पावसाचे सावट आहे. पावसामुळे नाणेफेकीला उशीर झाला आहे.

Story img Loader