India vs Ireland T20I Series: वेस्ट इंडिजचा दौरा संपल्यानंतर भारतीय संघ आयर्लंडच्या दौऱ्यावर रवाना होईल जिथे संघ तीन सामन्यांची टी२० मालिका खेळेल. या दौऱ्यातील पहिला सामना 18 ऑगस्ट रोजी होणार आहे. जिथे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या मालिकेसाठी आधीच संघ जाहीर केला होता. त्याचबरोबर यजमान आयर्लंडनेही १५ सदस्यीय संघ जाहीर केला असून, त्यांचे कर्णधारपद पॉल स्टर्लिंगकडे सोपवण्यात आले आहे.

पुढील वर्षी वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी आयर्लंडचा संघ आधीच पात्र ठरला आहे. या मालिकेत विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून संघ खेळणार आहे. भारतीय संघातही अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.

icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
shams mulani
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: मुंबईकडून ओडिशाचा डावाने धुव्वा
Congress president Mallikarjun Kharge criticism of BJP
‘बांटना और काटना’हे भाजपचे काम – खरगे
Chhagan Bhujbal statement that he is involved in power for development
ईडीमुळे नव्हे, तर विकासासाठी सत्तेत सहभागी; छगन भुजबळ यांची सारवासारव
Twenty20 series India vs South Africa match sport news
भारताच्या युवा ताऱ्यांचा कस; दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेतील पहिला सामना आज
yogendra yadav BJP Traitor Party
भाजप देशद्रोही पक्ष – योगेंद्र यादव

आयर्लंड क्रिकेट संघ नुकताच पुढील वर्षी होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. यामुळे आयर्लंडची टीम मानसिकदृष्ट्या मजबूत झाली आहे, ती भारताशी स्पर्धा करू शकते. रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह भारताचे अनेक वरिष्ठ खेळाडू या दौऱ्यात सहभागी नाहीत. अनेक महिन्यांनंतर दुखापतीतून पुनरागमन केलेल्या हार्दिक पांड्याकडे भारताचे कर्णधारपद असेल. आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंग आहे.

भारताविरुद्धच्या T20 मालिकेसाठी आयर्लंडचा संघ

पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्र्यू बालबर्नी, मार्क अडायर, रॉस अडायर, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, फिओन हँड, जोशुआ लिटल, बॅरी मॅककार्थी, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, थिओ व्हॅन वूरकॉम, बेन व्हाइट, क्रेग यंग.

हेही वाचा: Alex Hales Retirement : विश्वचषकापूर्वी इंग्लंडला मोठा धक्का, धडाकेबाज खेळाडूकडून निवृत्ती जाहीर

जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळणार आहे

या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी, भारतीय संघाचे नेतृत्व जसप्रीत बुमराहकडे असेल, जो पाठीच्या दुखापतीतून पूर्णपणे बरा झाल्यानंतर प्रदीर्घ कालावधीनंतर मैदानात परतणार आहे. याशिवाय या टी२० मालिकेसाठी रिंकू सिंग आणि जितेश शर्मा यांचाही टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे.

भारतीय संघ

जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकेटकीपर), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, कृष्णा, प्रसिद्ध कृष्णा अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान.

हेही वाचा: IND vs WI 1st T20: आधीच उल्हास त्यात…; पराभवानंतर टीम इंडियाला आणखी एक मोठा झटका, ICCने ठोठावला दंड

येथे पूर्ण वेळापत्रक पहा

पहिला टी२० – १८ ऑगस्ट, डब्लिन, संध्याकाळी ७.३० IST

दुसरा टी२० – २० ऑगस्ट, डब्लिन, संध्याकाळी ७.३० IST

तिसरा टी२० – २३ ऑगस्ट, डब्लिन, ७.३० PM IST