IND vs IRE T20 Series Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच (ऑगस्ट १५) मंगळवारी सकाळी आयर्लंडला रवाना झाला. टीम इंडिया आयर्लंडविरुद्ध तीन टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. अनेक खेळाडूंसाठी ही एक महत्त्वाची मालिका असेल पण सर्वांच्या नजरा जसप्रीत बुमराहवर असतील. तब्बल दीड वर्षानंतर जसप्रीत बुमराह राष्ट्रीय संघात पुनरागमन करत आहे. पाठीच्या दुखापतीमुळे संघापासून दूर होता. भारतीय क्रिकेट बोर्डाने मंगळवारी सकाळी संघ आयर्लंडला रवाना झाल्याची छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केली. भारतीय क्रिकेटपटूंचे हसरे चेहरे हे दाखवतात की खेळाडू चांगल्या स्थितीत आहेत.

वेस्ट इंडिजविरुद्धची टी२० मालिका गमावल्यानंतर आता टीम इंडियाचा सामना आयर्लंडशी दोन हात करणार आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यात १८ ऑगस्टपासून तीन सामन्यांची टी२० मालिका खेळवली जाणार आहे. मात्र, या मालिकेत टीम इंडियाची कमान जसप्रीत बुमराहच्या हाती आहे. आयर्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेत जवळपास सर्व वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. जसप्रीत बुमराह या संघाचा कर्णधार आहे. त्याचबरोबर यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, शाहबाद अहमद, शिवम दुबे आणि जितेश शर्मा या युवा खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे.

IND vs ENG Pakistani Origin England Bowler Saqid Mahmood Denied Visa To India
IND vs ENG: पाकिस्तान वंशाच्या इंग्लंड खेळाडूला भारत व्हिसा नाकारला, भारत दौऱ्यात खेळू शकणार?
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
India Beat Ireland by 305 Runs and Registers Biggest Margin Victory in Womens ODI Cricket INDW vs IREW
INDW vs IREW: ऐतिहासिक! भारताच्या महिला संघाने नोंदवला इतिहासातील सर्वात मोठा विजय, आयर्लंडचा उडवला धुव्वा
IND vs IRE Smriti Mandhana and Pratika Rawal 233 run partnership broke a 20 year old record against Ireland
IND vs IRE : स्मृती-प्रतिकाच्या द्विशतकी भागीदारीने केला मोठा पराक्रम! मोडला २० वर्षांपूर्वीचा ‘हा’ खास विक्रम
Pratika Rawal Maiden ODI Century in INDW vs IREW New India Opener After Continues Fifties
INDW vs IREW: टीम इंडियाची युवा सलामीवीर प्रतिका रावलचं पहिलं वनडे शतक, भारतीय अंपायरच्या लेकीची धमाकेदार खेळी
IND vs ENG Aakash Chopra questioned absence of Shivam Dube from India squad for the upcoming T20I series
IND vs ENG : भारताच्या टी-२० संघात CSK च्या खेळाडूला संधी न मिळाल्याने माजी खेळाडू संतापला, उपस्थित केले प्रश्न
IND vs ENG T20I Series Full Schedule Timings and Squads in Detail
IND vs ENG: भारत वि इंग्लंड टी-२० मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक एकाच क्लिकवर! जाणून घ्या सामन्याची नेमकी वेळ
Karun Nair ready to make a comeback to Indian team after scored 4 consecutive centuries in Vijay Hazare Trophy 2024-25
Karun Nair : त्रिशतकवीर आठ वर्षानंतर पुनरागमनासाठी सज्ज! सलग चार शतकं झळकावत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा

दुखापतीनंतर जसप्रीत बुमराह करणार भारतीय संघात पदार्पण

आयर्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी, भारतीय संघाचे नेतृत्व जसप्रीत बुमराहकडे असेल, जो पाठीच्या दुखापतीतून पूर्णपणे बरा तंदुरस्त झाला आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर तो मैदानात परतणार आहे, याशिवाय या टी२० मालिकेसाठी रिंकू सिंग आणि जितेश शर्मा यांचाही टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने खुद्द याबाबतचे ट्वीट शेअर केले आहे आणि पोस्टच्या खाली “हम आ गये.” हे शीर्षक दिले आहे.

आयर्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघ

जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाबा अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार आणि आवेश खान.

हेही वाचा: Tilak Varma:  वर्ल्डकपमध्ये तिलक वर्माला संधी मिळणार का? रोहित शर्माचे मोठे विधान; म्हणाला, “मी त्याच्याबद्दल आता एवढेच सांगेन…”

भारताविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी आयर्लंड संघ

पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्र्यू बालबर्नी, मार्क एडेअर, रॉस अडायर, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, फिओन हँड, जोशुआ लिटल, बॅरी मॅककार्थी, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, थिओ व्हॅन व्होइरकॉम , बेन व्हाईट आणि क्रेग यंग.

सामना कुठे, कधी आणि कसा पाहणार?

Viacom-18 ला भारत आणि आयर्लंड यांच्यातील टी२० मालिकेचे प्रसारण हक्क मिळाले आहेत. अशा परिस्थितीत, स्पोर्ट्स १८वर टीम इंडिया आणि आयर्लंड टी२० मालिकेचा आनंद पहिल्यांदाच घेता येईल. फॅनकोड आणि जिओ सिनेमावरही ही मालिका पाहता येईल.

हेही वाचा: Ben Stokes: बेन स्टोक्सचा यू-टर्न! एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमनाचे दिले संकेत अन् CSK संदर्भात म्हणतो…

भारत-आयर्लंड टी२० मालिकेचे वेळापत्रक

१८ ऑगस्ट – पहिली टी२० (डब्लिन), भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता

२० ऑगस्ट – दुसरी टी२० (डब्लिन), भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता

२३ ऑगस्ट – तिसरी टी२० (डब्लिन), भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता

Story img Loader