SAFF Championship 2023, IND vs KUW Final: भारतीय फुटबॉल संघाने सॅफ चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत कुवेतचा पराभव केला. या विजयासह त्याने नवव्यांदा विजेतेपद पटकावले. भारताने पेनल्टी शूटआऊटमध्ये कुवेतचा ५-४ असा पराभव केला. बंगळुरूच्या ‘श्री कांतीरवा’ स्टेडियमवर निर्धारित ९० मिनिटे दोन्ही संघ १-१ ने बरोबरीत होते. ३० मिनिटांच्या अतिरिक्त वेळेतही कोणत्याही संघाला दुसरा गोल करता आला नाही. अशा परिस्थितीत पेनल्टी शूटआऊटमध्ये सामन्याचा निकाल लागला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सॅफ फुटबॉल चॅम्पियनशिपचा अंतिम सामना गतविजेता भारत आणि कुवेत यांच्यात खेळला गेला. भारतीय संघाने आपला उत्कृष्ट विक्रम कायम राखत नववे विजेतेपद पटकावले आहे. तत्पूर्वी, उपांत्य फेरीत भारताने पेनल्टी शूटआऊटमध्ये लेबनॉनचा ४-२ असा दुसरीकडे कुवेतने बांगलादेशचा १-० असा पराभव केला. भारतीय संघ दुसऱ्यांदा कुवेतविरुद्ध खेळला. याआधी ‘अ’ गटात दोन्ही संघांमध्ये १-१ अशी बरोबरी होती.

भारताने ही स्पर्धा जिंकली

अंतिम फेरीत कुवेतचा पराभव करून भारताने सॅफ चॅम्पियनशिप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. त्याने नवव्यांदा हे विजेतेपद पटकावले आहे. भारत यापूर्वी १९९३, १९९७, १९९९, २००५, २००९, २०११, २०१५ आणि २०२१ मध्ये चॅम्पियन बनला होता. स्पर्धेच्या १४ वर्षांच्या इतिहासात, भारत नऊ वेळा चॅम्पियन म्हणून उदयास आला आहे आणि चार वेळा उपविजेता ठरला.

भारताने पेनल्टी शूटआऊटमध्ये कुवेतचा ४-४ असा पराभव केला. कर्नाटकातील बंगळुरूमध्ये ‘श्री कांतीरवा’ स्टेडियमवर निर्धारित ९० मिनिटे दोन्ही संघ १-१ ने बरोबरीत होते. ३० मिनिटांच्या अतिरिक्त वेळेतही कोणत्याही संघाला दुसरा गोल करता आला नाही. अशा परिस्थितीत पेनल्टी शूटआऊटमध्ये सामन्याचा निकाल लागला.

हेही वाचा: Aakash Chopra: माजी खेळाडू आकाश चोप्राचे श्रेयस अय्यरबाबत मोठे विधान; म्हणाला, “त्याला आधी त्याच्या दोन गोष्टी…”

गुरप्रीत सिंगने टीम इंडियाला विजयी केले

गोलरक्षक गुरप्रीत सिंगने भारताला हा विजय मिळवून दिला. त्याने पेनल्टी शूटआऊटमध्ये चमकदार कामगिरी करत कुवेतचा कर्णधार खालिद अल इब्राहिमचा अंतिम शॉट रोखला. पेनल्टी शूटआऊटमध्ये दोन्ही संघांना प्रत्येकी पाच गोल करण्याच्या पाच संधी मिळतात. यामध्ये जो संघ चुकतो तो सामना हरतो. निर्धारित प्रत्येकी पाच शॉट्सनंतर दोन्ही संघ प्रत्येकी चार बरोबरीत होते. भारतासाठी उदांता सिंग आणि कुवेतसाठी मोहम्मद अब्दुल्ला हे लक्ष्य गाठण्यात चुकले. चार-चार बरोबरीनंतर अचानक सर्व चाहत्यांनी श्वास रोखून धरला होता, अशावेळी यामध्ये जो संघ गोल करण्यास चुकतो तो थेट पराभूत होतो. त्याला दुसरी संधी मिळत नाही. सडन डेथमध्ये भारताकडून नौरेम महेश सिंगने गोल केला. त्याचवेळी कुवेतचा कर्णधार खालिदचा फटका भारताचा गोलरक्षक गुरप्रीत सिंगने रोखला आणि भारत विजयी झाला, तो टीम इंडियाचा हिरो ठरला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs kuw final india made history defeat the mighty kuwait 5 4 to seal the saf championship avw