India vs Nederland, ICC World Cup 2023: नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी चौकार-षटकारांची आतिषबाजी केली. श्रेयस अय्यर आणि के.एल. राहुल या दोघांनी अफलातून शतके ठोकत चाहत्यांना दिवाळीची भेट दिली. बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि नेदरलँड्स यांच्या सामन्यादरम्यान आज मोठ्या फटाक्यांऐवजी फटके मारत चाहत्यांचे मनोरंजन केले. वन डे विश्वचषक २०२३ मधील या अखेरच्या साखळी सामन्यात भारताच्या फलंदाजांनी तुफानी फटकेबाजी केली. श्रेयस अय्यर आणि के.एल राहुल यांनी या सामन्यात वादळी फलंदाजी करताना वन डे विश्वचषक कारकीर्दीतील पहिले शतक झळकावले. एकप्रकारे भारतीय फलंदाजांनी उपांत्य फेरीआधी न्यूझीलंडला इशारा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील सामना हा देखील साखळी फेरीतील शेवटचा सामना आहे. यानंतर १५ आणि १६ नोव्हेंबरला दोन उपांत्य फेरीचे सामने होतील. भारतीय संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचला आहे आणि न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी सामना सराव म्हणून १५ तारखेला मैदानात उतरेल. त्याचवेळी नेदरलँडचा संघ विश्वचषकातून बाहेर पडला आहे. गुणतालिकेत तो सध्या शेवटच्या स्थानावर आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ४१० धावा केल्या.

भारताने उभारला ४१० धावांचा डोंगर

प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ४ गडी गमावून ४१० धावांचा डोंगर उभारला आहे. श्रेयस अय्यरने सर्वाधिक नाबाद १२८ धावा केल्या. त्याला लोकेश राहुलने १०२ धावांची खेळी करत उत्तम साथ दिली. कर्णधार रोहितने ६१ धावांची आक्रमक खेळी करत संघाला चांगली करून दिली. शुबमन गिल आणि विराट कोहलीने प्रत्येकी ५१ धावांचे योगदान दिले. या सामन्यात भारताच्या पहिल्या पाच फलंदाजांनी ५० हून अधिक धावा करत एक नवीन विक्रम प्रस्थापित केला. लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी चौथ्या विकेटसाठी २०८ धावांची भक्कम भागीदारी केली. विश्वचषकात भारताची ही दुसरी सर्वोत्तम धावसंख्या आहे. यापूर्वी भारताने २००७ मध्ये बर्म्युडाविरुद्ध ४१३ धावा केल्या होत्या. लोकेश राहुलने ६२ चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि ते देशासाठी विश्वचषकातील सर्वात वेगवान शतक ठरले. नेदरलँड्सकडून जस्ट-डी-लीडेने दोन विकेट्स घेतल्या. मीकरेन आणि मर्व्ह यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

विश्वचषक २०२३च्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा सामना करण्यापूर्वी भारतीय फलंदाजांचा आज उत्तम सराव झाला आहे, असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. नेदरलँड्सविरुद्धच्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात भारतीय फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी केली. रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली व श्रेयस अय्यर या पहिल्या चार फलंदाजांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावून विश्वविक्रम रचला. सामना सुरु असताना रवी शास्त्री, इरफान पठाण आणि जतीन सप्रू यांनी टीम इंडियाचे कौतुक करत म्हटले की, ” जसे होळीला रंग बरसे असत तसे दिवाळीला आता रन बरसे म्हणावे लागेल.” असे म्हणताच एकच हशा पिकला.

राहुलने रोहित शर्माचा विक्रम मोडला

राहुलने ६२ चेंडूत शतक झळकावले, जे भारतासाठी विश्वचषकातील सर्वात वेगवान शतक करत राहुलने रोहितचा विक्रम मोडला. रोहितने याच विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्ध ६३ चेंडूत शतक झळकावले होते. राहुलने श्रेयस अय्यरसोबत चौथ्या विकेटसाठी १२८ चेंडूत २०८ धावांची भागीदारी केली.

विश्वचषकात भारतासाठी सर्वात जलद शतक

६२ चेंडू- केएल राहुल विरुद्ध नेदरलँड्स, २०२३
६३ चेंडू – रोहित शर्मा विरुद्ध अफगाणिस्तान, २०२३
८१ चेंडू – वीरेंद्र सेहवाग विरुद्ध बर्म्युडा, २००७
८३ चेंडू – विराट कोहली विरुद्ध बांगलादेश, २०११