India vs Netherlands ICC Cricket World Cup 2023 Match Updates: एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या ४५व्या आणि शेवटच्या साखळी सामन्यात भारताने नेदरलँड्सचा १६० धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने गट फेरीतील आपले सर्व सामने जिंकले. त्यांनी सर्व नऊ प्रतिस्पर्ध्यांचा पराभव इतिहास रचला. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाने ५० षटकांत चार विकेट गमावत ४१० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात नेदरलँड्सचा संघ ४७.४ षटकांत सर्वबाद २५० धावांवर आटोपला. टीम इंडियाने दिवाळीच्या दिवशी चाहत्यांना विजयाची भेट दिली.

टीम इंडियाचा सामना आता पहिल्या उपांत्य फेरीत १५ नोव्हेंबरला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडशी होणार आहे. भारत या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित आहे. त्यांनी सर्व नऊ संघांचा पराभव केला आहे. भारताने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्सचा पराभव केला. गुणतालिकेत टीम इंडियाचे १८ गुणांसह अव्वल स्थानी आहे. दुसरीकडे, नेदरलँड्सने विश्वचषकातील आपला प्रवास तळाच्या १०व्या स्थानावर संपवला. नेदरलँड्सला नऊ सामन्यांत दोन विजय मिळवता आले आणि सात सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर नेदरलँड चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये सहभागी होऊ शकणार नाही.

Bangladesh Fan Tiger Robi Claims He Was Assaulted by the Kanpur Crowd in Green Park Stadium IND vs BAN
IND vs BAN: बांगलादेश संघाच्या चाहत्याला कानपूर स्टेडियममध्ये मारहाण, शिवीगाळ करून जमावाने हल्ला केल्याचा आरोप
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Dinesh Karthik reaction about Rishabh Pant and MS Dhoni
IND vs BAN : ऋषभ पंत कसोटीत धोनीपेक्षा सरस आहे का? दिनेश कार्तिकने दिले उत्तर, चाहत्यांना केले ‘हे’ आवाहन
IND vs BAN Virat kohli starts batting practice after fails to score
IND vs BAN : विराटने दोन्ही डावात अपयशी ठरल्यानंतर सामन्यादरम्यानच सुरु केला सराव, नेटमधील VIDEO व्हायरल
IND vs BAN Shubman Gill fifth Test century against Bangladesh
IND vs BAN : शुबमनने शतक झळकावत भारताचा बाबर म्हणणाऱ्यांची बोलती केली बंद, भारताने बांगलादेशला दिले ५१५ धावांचे लक्ष्य
Rohit Sharma Became First Captain to Complete 1000 Runs in 2024 IND vs BAN 1st Test
IND vs BAN: रोहित शर्माने चेन्नई कसोटीत केला मोठा पराक्रम; २०२४ मध्ये ही कामगिरी करणारा ठरला पहिला कर्णधार
Virat Kohli chanted om namah shivay Gautam Gambhir listened Hanuman Chalisa
कोहलीने कोणत्या सीरिजमध्ये प्रत्येक चेंडूपूर्वी ओम नम: शिवाय म्हटलं? गंभीरसाठी हनुमान चालिसा कशी ठरली किमयागार?
Virat Kohli Jersey Flaunts by Fan During Babar Azam Match in Pakistan Champions Cup video
Video: पाकिस्तानमध्ये विराटची जबरदस्त क्रेझ, बाबर आझमच्या सामन्यात चाहत्याने दाखवली किंग कोहलीची जर्सी

तेजा निदामनुरुने नेदरलँड्सकडून सर्वाधिक धावा केल्या –

लक्ष्याचा पाठलाग करताना सातव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या तेजा निदामनुरूने नेदरलँड्सकडून सर्वाधिक ५४ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून सहा षटकार आणि एक चौकार आला. तेजा नंतर, संघाचा दुसरा सर्वाधिक धावा करणारा सिब्रांड एंजेलब्रेक्ट होता. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना एंजेलब्रेक्टने ४५ धावा केल्या. या दोन फलंदाजांव्यतिरिक्त तिसऱ्या क्रमांकावर खेळताना कॉलिन अकरमनने ३५ धावांचे योगदान दिले. राट कोहली आणि रोहित शर्मानेही गोलंदाजी करताना १-१ विकेट घेतली. त्याचबरोबर बुमराह, सिराज, कुलदीप आणि जडेजाने २-२ विकेट्स घेतल्या.

हेही वाचा – IND vs NED, World Cup 2023: रोहित शर्माने मोडला इऑन मॉर्गनचा विक्रम, सचिन तेंडुलकरच्या ‘या’ विक्रमाशी केली बरोबरी

तत्पूर्वी टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना ४१० धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. भारताकडून श्रेयस अय्यर (नाबाद १२८) आणि केएल राहुल (१०२) यांनी शतके झळकावली. विश्वचषकात भारताची ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. याआधी शुबमन गिल ५१, रोहित शर्मा ६१ आणि विराट कोहलीने ५१ यांनी अर्धशतके झळकावली होती. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच, भारताच्या शीर्ष ५ खेळाडूंनी ५० पेक्षा जास्त धावा केल्या. केएल राहुलने अवघ्या ६२ चेंडूत शतक झळकावले. राहुल आता भारतासाठी सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज बनला आहे.