India vs Nepal, Asia Cup 2023: आशिया कपमध्ये भारताचा दुसरा सामना नेपाळशी आहे. नेपाळच्या संघाला पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता. त्याचवेळी भारताचा पाकिस्तानसोबतचा पहिला सामना पावसाने व्यत्यय आणला होता. भारत आणि नेपाळमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ सुपर फोरमध्ये प्रवेश करेल. मात्र, नेपाळसाठी भारताला हरवणे अत्यंत कठीण असेल. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नवख्या नेपाळने भारतीय गोलंदाजांचा घाम काढला असून टीम इंडियासमोर २३१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेपाळ संघ पहिल्यांदा आशिया चषक खेळत असून सोमवारी हा संघ पहिल्यांदा भारताविरुद्ध वन डे सामना खेळला. असात नेपाळ संघासाठी हा सामना अधिकच महत्वाचा होता. या महत्वपूर्ण सामन्यात असिफ शेख  याने आपली गुणवत्ता सिद्ध केले. त्याने भारताच्याच्या वेगवान आणि फिरकी गोलंदाजांपुढे चौकारांची रांग लावली. असिफने ९७ चेंडूत ८ चौकारांच्या मदतीने ५८ धावांची शानदार खेळी केली. नेपाळच्या डावातील ३०व्या षठकात मोहम्मद सिराज गोलंदाजी करत होता. सिराजने टाकलेल्या पाचव्या चेंडूवर विराट कोहलीच्या हातात असिफ झेलबाद झाला. तत्पूर्वी सलामीवीर कुशल भुर्टेल २५ चेंडूत ३८ धावा करून यष्टीरक्षक ईशान किशनच्या हातात झेलबाद झाला होता.

नेपाळसारख्या नवशिक्या संघाला ऑलआऊट करण्यासाठी भारताला ४८.२ षटके लागली. नेपाळच्या संघाने भारतीय गोलंदाजांना चांगलेच थकवले आणि २३० धावा केल्या. भारताकडून मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतले. त्याचवेळी नेपाळकडून आसिफ शेखने सर्वाधिक ५८ धावा केल्या, त्याच्या खालोखाल सोमपाल कामीने ४८ धावांची उत्कृष्ट खेळी केली. भारतीय गोलंदाजांची ही कामगिरी पाहता विश्वचषकात टीम इंडियाच्या विजयाच्या शक्यतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जर आजचा सामना भारताने जिंकला तर आशिया चषकाच्या सुपर ४मध्ये प्रवेश करेल.

हेही वाचा: IND vs AUS: विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, ‘हा’ धडाकेबाज खेळाडू भारताविरुद्धच्या मालिकेतून बाहेर

दोन्ही संघाची प्लेईंग ११

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

नेपाळ: कुशल भुर्तेल, आसिफ शेख (विकेटकीपर), रोहित पौडेल (कर्णधार), भीम शार्की, सोमपाल कामी, गुलसन झा, दीपेंद्र सिंग आयरे, कुशल मल्ला, संदीप लामिछाने, करण केसी, ललित राजबंशी.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs nep nepal gave india a target of 231 runs 48 overs were played excellent batting by sompal asif avw
Show comments