India vs Nepal, Asia Cup 2023: भारत आणि नेपाळ यांच्यात आशिया चषकातील पाचवा सामना श्रीलंकेतील कॅंडी येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर संपन्न झाला. नवख्या नेपाळने भारतासमोर २३१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, पावसाने सामन्यात खोडा घातला आणि डकवर्थ लुईसच्या नियमानुसार भारताला १४५ धावांचे लक्ष्य मिळाले आणि टीम इंडियाने १० गडी राखून पूर्ण केले. नेपाळ संघाला पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आशिया चषक २०२३मधून बाहेर पडणारा नेपाळ हा पहिला संघ ठरला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दुसरीकडे भारताचा पाकिस्तानसोबतचा पहिला सामना पावसामुळे वाहून गेला होता. भारत आणि नेपाळमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना संपन्न झाला. हा सामना जिंकणारा संघ सुपर फोरमध्ये प्रवेश करणार होता आणि या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि सलामीवीर शुबमन गिल यांनी शानदार अर्धशतके झळकावत टीम इंडियाला १० विकेट्सने दणदणीत विजय मिळवून दिला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. नेपाळने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद २३० धावा केल्या होत्या. प्रत्युतरात भारताने फलंदाजीला शानदार सुरुवात केली.
सामन्यात पावसाने पुन्हा खोडा घातला. त्यावेळी भारताने २.१ षटकात एकही विकेट न गमावता १७ धावा केल्या होत्या. कर्णधार रोहित शर्मा ४ धावा आणि शुबमन गिल १२ धावा करून नाबाद होते. त्यानंतर पाऊस थांबला आणि दोन्ही अंपायर्सनी मैदानाचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी ठरवले की रात्री १०.१५ मिनिटांनी सुरू होईल, असे सांगितले. डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला २३ षटकात १४५ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. अशा स्थितीत आता भारताला २०.५ षटकात १२८ धावा करायच्या होत्या. कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी नेपाळच्या नवख्या गोलंदाजांवर हल्ला चढवत चौकार-षटकारांची आतिषबाजी केली. रोहितने ५७ चेंडूत ७४ धावा केल्या तर शुबमनने ६१ चेंडूत ६७ धावा केल्या. रोहितने त्याच्या या खेळीत ६ चौकार आणि ५ षटकारांचा साज चढवला. दुसरीकडे शुबमनने ८ चौकार आणि एक षटकार मारला.
तत्पूर्वी, नेपाळ संघ पहिल्यांदा आशिया चषक खेळत असून सोमवारी हा संघ पहिल्यांदा भारताविरुद्ध वन डे सामना खेळला. असात नेपाळ संघासाठी हा सामना अधिकच महत्वाचा होता. या महत्वपूर्ण सामन्यात असिफ शेख याने आपली गुणवत्ता सिद्ध केले. त्याने भारताच्याच्या वेगवान आणि फिरकी गोलंदाजांपुढे चौकारांची रांग लावली. असिफने ९७ चेंडूत ८ चौकारांच्या मदतीने ५८ धावांची शानदार खेळी केली. नेपाळच्या डावातील ३०व्या षठकात मोहम्मद सिराज गोलंदाजी करत होता. सिराजने टाकलेल्या पाचव्या चेंडूवर विराट कोहलीच्या हातात असिफ झेलबाद झाला. त्याआधी सलामीवीर कुशल भुर्टेल २५ चेंडूत ३८ धावा करून यष्टीरक्षक ईशान किशनच्या हातात झेलबाद झाला होता.
नेपाळसारख्या नवशिक्या संघाला ऑलआऊट करण्यासाठी भारताला ४८.२ षटके लागली. नेपाळच्या संघाने भारतीय गोलंदाजांना चांगलेच थकवले आणि २३० धावा केल्या. भारताकडून मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतले. त्याचवेळी नेपाळकडून आसिफ शेखने सर्वाधिक ५८ धावा केल्या, त्याच्या खालोखाल सोमपाल कामीने ४८ धावांची उत्कृष्ट खेळी केली. मात्र, नेपाळच्या पराभवाने त्यावर पाणी फिरवले गेले.