IND vs NEP, Asia CUP 2023: आशिया कपमध्ये भारताचा दुसरा सामना नेपाळशी आहे. नेपाळच्या संघाला पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता. त्याचवेळी भारताचा पाकिस्तानसोबतचा पहिला सामना पावसाने व्यत्यय आणला होता. भारत आणि नेपाळमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ सुपर फोरमध्ये प्रवेश करेल. मात्र, नेपाळसाठी भारताला हरवणे अत्यंत कठीण असेल. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोहम्मद शमीच्या पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर भुर्तेलचा सोपा झेल स्लिपमध्ये उभ्या असलेल्या श्रेयस अय्यरने सोडला. चेंडू हाताला लागला आणि उडून बाहेर गेला. त्यानंतर ना शमी आनंदी दिसत होता ना बाकीचे खेळाडू. यानंतर दुसऱ्या षटकात मोहम्मद सिराज गोलंदाजीसाठी आला. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर आसिफने कव्हर पॉइंटवर उभ्या असलेल्या विराट कोहलीच्या हातात सोपा झेल दिला. कोहलीने हा झेलही सोडला. चेंडू हातात बाऊन्स झाला आणि खाली पडला. यानंतर पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर यष्टिरक्षक इशान किशनने भुर्तेलचा सोपा झेल सोडला. त्याने लेग ग्लान्स करत त्याने फाईन लेगला शॉट खेळला. हे झेल सोडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारतीय संघाने नेपाळच्या सलामीवीरांना तीन जीवदान दिले आणि आजपर्यंत त्यांना एकही विकेट सोडता आलेली नाही. भारतीय संघाचे खराब क्षेत्ररक्षण दिसून आले. नेपाळच्या सलामीवीर फलंदाजांनी याचा फायदा घेत शानदार अर्धशतकी भागीदारी केली आहे. कुशल भुर्तेल आणि विकेटकीपर आसिफ शेख या दोघांनी चौकार-षटकारांची आतिषबाजी करत ६५ धावांची भक्कम सलामी भागीदारी केली. शार्दुल ठाकूरने अखेर ही जोडी फोडली. त्याने कुशल भुर्तेलला इशान किशनकरवी झेलबाद केले, कुशलने २५ चेंडूत ३८ धावा केल्या त्यात त्याने ३ चौकार आणि २ उत्तुंग षटकार मारले.

पल्लेकलमध्ये स्वच्छ हवामान

नाणेफेकीपूर्वी पल्लेकेलेमध्ये स्वच्छ हवामान. अशा स्थितीत पूर्ण सामना होण्याची शक्यता आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केल्यास मोठी धावसंख्या होऊ शकते. या मैदानावरील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला होता. मात्र, आज पूर्ण सामना होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: IND vs PAK: “बारिश के टाइम तो चाय-पकौड़े रखते हैं यार…”, भारत-पाक सामना रद्द झाल्यानंतर वीरेंद्र सेहवागने एसीसीला मारला टोमणा

दोन्ही संघाची प्लेईंग ११

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

नेपाळ: कुशल भुर्तेल, आसिफ शेख (विकेटकीपर), रोहित पौडेल (कर्णधार), भीम शार्की, सोमपाल कामी, गुलसन झा, दीपेंद्र सिंग आयरे, कुशल मल्ला, संदीप लामिछाने, करण केसी, ललित राजबंशी.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs nep team indias poor fielding ishan dropped catch after kohli shreyas avw
Show comments