IND vs NZ Final : टीम इंडिया रविवारी दुबईत चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना खेळणार आहे. या सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. चाहत्यांना हा सामना घरी बसून पाहता येणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना टीव्ही किंवा मोबाईल फोनवर लाईव्ह पाहू शकतो. टीम इंडियाने या स्पर्धेत आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. उपांत्य फेरीत त्यांनी ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय संघ दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सामना खेळणार आहे. भारत-न्यूझीलंड सामन्यासाठी खेळपट्टीचीही निवड करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान सामन्यासाठी वापरण्यात येणारी खेळपट्टीही अंतिम फेरीसाठी निवडण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना कधी आणि कुठे बघता येईल?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज रविवारी दुपारी २.३० वाजल्यापासून अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना Jio Hotstar मोबाइल ॲपवर लाईव्ह पाहता येईल. यासोबतच या सामन्याचे टीव्हीवर थेट प्रक्षेपणही होणार आहे. यासाठी स्टार स्पोर्ट्स किंवा स्पोर्ट्स १८ चॅनलचे सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. अंतिम सामन्याची कमेंट्री हिंदी आणि इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये ऐकता येईल.

भारताच्या या खेळाडूंनी आतापर्यंत दमदार कामगिरी

टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहली अव्वल स्थानावर आहे. कोहलीने ४ सामन्यात २१७ धावा केल्या आहेत. तर श्रेयस अय्यरने ४ सामन्यात १९५ धावा केल्या आहेत. शुभमन गिलने १५७ धावा केल्या आहेत.जर आपण सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांबद्दल बोललो तर मोहम्मद शमी संघासाठी अव्वल स्थानावर आहे. शमीने चार सामन्यांत ८ विकेट घेतल्या आहेत. तर वरुण चक्रवर्तीने २ सामन्यात ७ विकेट घेतल्या आहेत.

सामना किती वाजता होणार सुरू?

आता अंतिम सामन्याबाबत चाहत्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण होत आहे की, दुबईमध्ये खेळल्या जाणाऱ्या अंतिम सामन्याची वेळ बदलली आहे का? पण, असे काहीही नाही आणि सामना नियोजित वेळेवर खेळवला जाईल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा अंतिम सामना भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० वाजता खेळला जाईल. तर नाणेफेक २ वाजता होईल. आतापर्यंत स्पर्धेतील सगळे सामने याचवेळी सुरु झाले आहेत.

२५ वर्षांपूर्वीच्या पराभवाचा बदला भारत घेणार का?

ICC चँपियन्स ट्रॉफी २०२५ ची महाअंतिम फेरी आज रंगणार आहे. भारत आणि न्यूझीलँड या दोन्ही देशांच्या क्रिकेट टीम आज एकमेकांचा सामना करणार आहेत. टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सगळ्या सामन्यांमध्ये विजय मिळवत आजच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. तर न्यूझीलंडच्या टीमला लीग मॅचमध्येच भारताकडून पराभव पत्कारावा लागला आहे. सन २००० मध्ये या दोन्ही देशांमध्ये ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचाच सामना पार पडला होता. त्यावेळी किवींनी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. आता भारत २५ वर्षांनी हिशोब चुकता करणार का? याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे.