India vs New Zealand 1st ODI Match Updates: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना बुधवारी (दि. १८ जानेवारी) हैदराबाद येथे खेळण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने युवा फलंदाज शुबमन गिल याच्या शानदार द्विशतकाच्या जोरावर ८ बाद ३४९ धावा काढल्या. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या प्रमुख फलंदाजांनी नांग्या टाकल्यावर युवा अष्टपैलू मायकेल ब्रेसवेलने अखेरपर्यंत संघर्ष करत भारतीय संघाला विजयासाठी झुंजवले.

दोन्ही संघांमध्ये निकराची लढत झाली. शेवटच्या क्षणी सामना अधिकच रंजक बनला होता. त्याचवेळी, थेट सामन्यातच कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार हार्दिक पंड्या एकमेकांशी भिडले तेव्हा टीम इंडियावर त्याचा दबाव स्पष्टपणे दिसून आला. ज्याचा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. वास्तविक, न्यूझीलंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू मायकेल ब्रेसवेलच्या झटपट फलंदाजीमुळे भारतीय संघ तणावात होता. एका क्षणी असे वाटत होते की न्यूझीलंड खेळातून बाहेर पडेल आणि भारत हा सामना सहज जिंकेल. पण मायकेल ब्रेसवेलच्या धडाकेबाज शतकाने दहशत निर्माण केली.

Suryakumar Yadav video with Pakistani fan goes viral :
Suryakumar Yadav : तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात का येत नाही? चाहत्याच्या प्रश्नावर सूर्या म्हणाला, ‘हे आमच्या…’
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
IND vs SA Ryan Rickelton's 104 Metre Six man ran away with ball video viral
IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल
Mohammed Rizwan Takes DRS After Consulting With Adam Zampa and Loses Review Watch Video AUS vs PAK 2nd ODI
PAK vs AUS: हा काय प्रकार? मोहम्मद रिझवानने ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूच्या सांगण्यावरून घेतला रिव्ह्यू अन् सापडला अडचणीत; पाहा VIDEO
AUS vs PAK Pat Cummins responding to Kamran Akmal mockery of the Australian team
AUS vs PAK : कामरान अकमलला ऑस्ट्रेलियन संघाची खिल्ली उडवणे पडले महागात; पॅट कमिन्सने दिले चोख प्रत्युत्तर, VIDEO व्हायरल
IND vs NZ Anil Kumble Lashes Out At Rohit Sharma and Gautam Gambhir
IND vs NZ : ‘तुम्ही फलंदाजांना दोष देऊ नका…’, मालिका गमावल्यानंतर अनिल कुंबळे रोहित-गौतमवर संतापले
IND vs NZ Harbhajan Singh Statement
IND vs NZ : ‘भारतासाठी ‘ती’ गोष्ट शत्रू ठरतेय…’, मायदेशात पहिल्यांदाच कसोटीत व्हाइट वॉश झाल्यानंतर हरभजन सिंगचे मोठे वक्तव्य
IND vs NZ Tom Latham Statement After India clean sweep
IND vs NZ : ‘आम्ही भारतीय संघाच्या खेळण्याच्या पद्धतीबद्दल…’, ऐतिहासिक मालिका विजयानंतर टॉम लॅथमने सांगितले किवीच्या यशाचे गुपित

रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या एकमेकांत भिडले

अशा स्थितीत किवी संघाला शेवटच्या २ षटकात २४ धावांची गरज होती. त्यामुळे कर्णधार रोहित शर्माने उपकर्णधार आणि त्याचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याकडे चेंडू सोपवला. ४९व्या षटकाच्या पहिल्या चेंडूनंतर रोहित आणि हार्दिक यांच्यात जोरदार वादावादी झाली. दोन्ही खेळाडूंना एकमेकांची योजना मान्य नव्हती. पण अखेरीस उपकर्णधार हार्दिकला रोहित शर्मापुढे नमते घ्यावे लागले. त्याच्या हावभावावरून तो हार्दिक पांड्याला त्याने सांगितल्याप्रमाणे करण्यास सांगत असल्याचे दिसते. दोन दिग्गजांमधील जोरदार देवाणघेवाणीचा तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

किंग कोहलीबरोबर घातली होती हुज्जत

श्रीलंकेविरूद्ध झालेल्या मालिकेतील एका सामन्यात हार्दिक पांड्यानं कोहलीला धाव घेण्यापासून रोखलं आणि त्याचा हा निर्णय विराटला पटला नाही. त्यानं डोळ्यातूनच इशारा देत पांड्यावर आपण नाराज असल्याचं स्पष्टपणे दाखवून दिलं होत. यावेळी पांड्या त्याच्या नजरेला नजरच देऊ शकला नाही. त्याच सामन्यादरम्यान आणखी एक घटना घडली त्यात त्यांच्यामध्ये असं काही घडलं की तिथेही किंग कोहलीचे चिडलेले हावभाव सर्वांनीच पाहिले.

हेही वाचा: Rahul Dravid’s Son: बाप से बेटा सवाई! ‘ज्युनिअर द वाल’ आता झाला या संघाचा कर्णधार, राहुल द्रविडच्या मुलाला मिळाली मोठी संधी

हार्दिक पांड्याने केली होती शिवीगाळ

भारत आणि श्रीलंका यांच्यातील कोलकात्याच्या इडन गार्डनवर दुसरा एकदिवसीय सामना खेळवण्यात आला होता. सामन्याच्या दहाव्या षटकानंतर कर्णधार रोहित शर्माने चेंडू हार्दिक पांड्याच्या हाती सोपवला. याचदरम्यान हार्दिक पांड्याने एक मोठी चूक केली. हार्दिक पांड्याने डग आऊटमध्ये बसलेल्या वॉशिंग्टन सुंदर खेळाडूकडे पाणी मागितलं होतं. पण ते न दिल्याने पांड्या रागाने लालबुंद झाला, यावेळी कॅमेरासमोर शिवीगाळ करताना तो पकडला गेला होता. आधीच्या षटकात पाणी मागितलं होतं, अजून आलं नाही, “तिथे बसून  काय XXX आहात’ असे अपशब्द त्याने वापरले होते.