India vs New Zealand 1st ODI Match Updates: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना बुधवारी (दि. १८ जानेवारी) हैदराबाद येथे खेळण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने युवा फलंदाज शुबमन गिल याच्या शानदार द्विशतकाच्या जोरावर ८ बाद ३४९ धावा काढल्या. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या प्रमुख फलंदाजांनी नांग्या टाकल्यावर युवा अष्टपैलू मायकेल ब्रेसवेलने अखेरपर्यंत संघर्ष करत भारतीय संघाला विजयासाठी झुंजवले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दोन्ही संघांमध्ये निकराची लढत झाली. शेवटच्या क्षणी सामना अधिकच रंजक बनला होता. त्याचवेळी, थेट सामन्यातच कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार हार्दिक पंड्या एकमेकांशी भिडले तेव्हा टीम इंडियावर त्याचा दबाव स्पष्टपणे दिसून आला. ज्याचा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. वास्तविक, न्यूझीलंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू मायकेल ब्रेसवेलच्या झटपट फलंदाजीमुळे भारतीय संघ तणावात होता. एका क्षणी असे वाटत होते की न्यूझीलंड खेळातून बाहेर पडेल आणि भारत हा सामना सहज जिंकेल. पण मायकेल ब्रेसवेलच्या धडाकेबाज शतकाने दहशत निर्माण केली.
रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या एकमेकांत भिडले
अशा स्थितीत किवी संघाला शेवटच्या २ षटकात २४ धावांची गरज होती. त्यामुळे कर्णधार रोहित शर्माने उपकर्णधार आणि त्याचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याकडे चेंडू सोपवला. ४९व्या षटकाच्या पहिल्या चेंडूनंतर रोहित आणि हार्दिक यांच्यात जोरदार वादावादी झाली. दोन्ही खेळाडूंना एकमेकांची योजना मान्य नव्हती. पण अखेरीस उपकर्णधार हार्दिकला रोहित शर्मापुढे नमते घ्यावे लागले. त्याच्या हावभावावरून तो हार्दिक पांड्याला त्याने सांगितल्याप्रमाणे करण्यास सांगत असल्याचे दिसते. दोन दिग्गजांमधील जोरदार देवाणघेवाणीचा तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
किंग कोहलीबरोबर घातली होती हुज्जत
श्रीलंकेविरूद्ध झालेल्या मालिकेतील एका सामन्यात हार्दिक पांड्यानं कोहलीला धाव घेण्यापासून रोखलं आणि त्याचा हा निर्णय विराटला पटला नाही. त्यानं डोळ्यातूनच इशारा देत पांड्यावर आपण नाराज असल्याचं स्पष्टपणे दाखवून दिलं होत. यावेळी पांड्या त्याच्या नजरेला नजरच देऊ शकला नाही. त्याच सामन्यादरम्यान आणखी एक घटना घडली त्यात त्यांच्यामध्ये असं काही घडलं की तिथेही किंग कोहलीचे चिडलेले हावभाव सर्वांनीच पाहिले.
हार्दिक पांड्याने केली होती शिवीगाळ
भारत आणि श्रीलंका यांच्यातील कोलकात्याच्या इडन गार्डनवर दुसरा एकदिवसीय सामना खेळवण्यात आला होता. सामन्याच्या दहाव्या षटकानंतर कर्णधार रोहित शर्माने चेंडू हार्दिक पांड्याच्या हाती सोपवला. याचदरम्यान हार्दिक पांड्याने एक मोठी चूक केली. हार्दिक पांड्याने डग आऊटमध्ये बसलेल्या वॉशिंग्टन सुंदर खेळाडूकडे पाणी मागितलं होतं. पण ते न दिल्याने पांड्या रागाने लालबुंद झाला, यावेळी कॅमेरासमोर शिवीगाळ करताना तो पकडला गेला होता. आधीच्या षटकात पाणी मागितलं होतं, अजून आलं नाही, “तिथे बसून काय XXX आहात’ असे अपशब्द त्याने वापरले होते.