न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वन-डे सामन्यात भारतीय संघाने त्रिशतकी धावसंख्येचा टप्पा गाठला. श्रेयस अय्यरचं शतक आणि लोकेश राहुल-विराट कोहली जोडीने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने न्यूझीलंडला विजयासाठी ३४८ धावांचं आव्हान दिलं. लोकेश राहुलने मधल्या फळीत फलंदाजी करत असताना धडाकेबाज फलंदाजी करत ८८ धावा केल्या. त्याच्या या खेळीवर भारताचा माजी खेळाडू मोहम्मद कैफ भलताच खूश झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अवश्य वाचा – Ind vs NZ : राहुलची गाडी सुस्साट ! धोनीचा विक्रम मोडला

लोकेश राहुल हा भारतीय संघाचा Swiss Knife असल्याचं कैफने आपल्या ट्विटर अकाऊंटवर म्हटलं आहे. आपल्या अर्धशतकी खेळीत लोकेश राहुलने ३ चौकार आणि सहा षटकार लगावले.

महेंद्रसिंह धोनीच्या अनुपस्थितीत यष्टीरक्षणाची संधी मिळालेल्या ऋषभ पंतने वारंवार संधी देऊनही निराशा केल्यामुळे राहुलकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली. याव्यतिरीक्त गेल्या काही दिवसांमध्ये राहुलने गरजेच्या वेळी फलंदाजीत सलामीला तर कधी मधल्या फळीत येऊन आपली कामगिरी चोख बजावली होती. याव्यतिरीक्त न्यूझीलंडविरुद्ध अखेरच्या टी-२० सामन्यात रोहित शर्मा दुखापतीमुळे माघारी परतल्यानंतरही राहुलने कर्णधाराची भूमिका बजावली होती. दरम्यान, न्यूझीलंडमध्ये वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या यष्टीरक्षकाचा मान आता राहुलला मिळाला आहे. त्याने धोनीचा ८५ धावांचा विक्रम मोडीत काढला.

अवश्य वाचा – Ind vs NZ : पहिल्याच वन-डे सामन्यात विराटची सचिनशी बरोबरी

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs nz 1st odi kaif calls k l rahul indias own swiss knife after his 88 run whirlwind knock psd