शुबमन गिल मैदानात तुफानी फलंदाजीमुळे आणि मैदानाबाहेर त्याच्या वैयक्तिक लाइफमुळे चर्चेत असतो. नुकतेच न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत द्विशतक झळकावणाऱ्या गिलला हैदराबादच्या खोडकर चाहत्यांनी ‘सारा-सारा’ म्हणत ट्रोल केले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओवर कमेंट करताना चाहते विचारत आहेत की, कोण सारा, सारा तेंडुलकर की सारा अली खान. काही काळापूर्वी शुबमन गिल सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हिला डेट करत असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र त्यानंतर त्याला सैफ अली खानची मुलगी सारा अली खानसोबत दिसला होता. त्यानंतर चाहत्यांचा गोंधळ उडाला होता की, शुभमन गिल कोणाला डेट करत आहे?
व्हायरल झालेल्या व्हिडिओबद्दल सांगायचे तर, न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान, शुबमन गिल सीमारेषेवर क्षेत्ररक्षणासाठी येत असताना, त्यादरम्यान तो प्रेक्षकांना अभिवादन करतो, तर मैदानावर उपस्थित काही खोडकर प्रेक्षक सारा-सारा म्हणू लागतात.
भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे मालिकेबद्दल बोलायचे, तर टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना १२ धावांनी जिंकून १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या या विजयात महत्त्वाचे योगदान शुबमन गिलचे होते. ज्याने द्विशतक झळकावून भारताला ३४९ धावांपर्यंत नेले.
हेही वाचा – ICC Online Fraud: आयसीसीसोबत झाला ‘जामतारा’सारखा कांड; तब्बल २१ कोटींचा लागला चुना
गिलने २०८ धावांची धडाकेबाज खेळी खेळली. दुहेरी शतक झळकावणारा जगातील सर्वात तरुण फलंदाज ठरला. भारत आणि न्यूझीलंड संघातील दुसरी वनडे शनिवारी खेळली जाणार आहे.