भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना आज हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हा हैदराबादचा असून आज त्याचे कुटुंबीय सिराजला खेळताना पाहण्यासाठी स्टेडियमवर आले आहेत. सिराजच्या कुटुंबीयांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये प्रत्येकजण सामन्याचा आनंद घेताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत आणि न्यूझीलंड संघांतील पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताकडून फलंदाजी करताना शुबमन गिलने विक्रमी द्विशतक झळकावले. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने ८ बाद ३४९ धावांचा डोंगर उभारला. त्यामुळे न्यूझीलंड संघासमोर ३५० धावांचे मोठे लक्ष्य ठेवता आले.

मोहम्मद सिराज आज ज्या ठिकाणी आहे, त्यामागे त्याने वर्षानुवर्षे घेतलेली मेहनत आहे. सिराज हा गरीब कुटुंबातून आला होता पण देशासाठी खेळणे हे त्याचे नेहमीच स्वप्न होते. सिराजचे वडील रिक्षाचालक होते आणि तरीही त्यांनी स्वतःच्या गुणवत्तेवर पहिल्यांदा आयपीएलमध्ये स्थान मिळवले. यानंतर त्याने टीम इंडियात आपली जागा पक्की केली.

उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आज पहिल्यांदाच आपल्या घरच्या मैदानावर भारताकडून खेळत आहे. आणि त्यानिमित्ताने त्याच्या कुटुंबातील काही खास सदस्य सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आले आहेत. सिराजने त्यांना निराश न करता सुरुवातीच्या षटकांमध्येच विकेट घेत आपल्या कुटुंबाला आनंद साजरा करण्याची संधी दिली. मोहम्मद सिराजने दोन महत्वाच्या विकेट घेतल्या.

हेही वाचा – T20 WC 2024: भारत पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामना अमेरिकेत रंगणार?

सामन्याबद्दल बोलायचे तर, भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर ३५० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघाने ३८ षटकांच्या समाप्तीनंतर ६ बाद २१४ धावा केल्या. अजून ही न्यूझीलंड संघाला विजयासाठी १२ षटकांत १३६ धावांची गरज आहे. मायकेल ब्रेसवेल (६९) आणि मिचेल सँटनर (२८) नाबाद आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs nz 1st odi mohammad sirajs family attends to watch him play photo is going viral vbm