Sanjay Manjrekar on Shubman Gill: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. हैदराबादच्या मैदानावर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात भारतीय संघाचा युवा गोलंदाज शुबमन गिलची कामगिरी उत्कृष्ट ठरली. त्याने पुन्हा एकदा आपल्या धडाकेबाज खेळीने सर्वांना प्रभावित केले. या सामन्यात त्याने एकदिवसीय कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावले. दरम्यान, क्रिकेटपटू बनलेले समालोचक संजय मांजरेकर यांनी गिलबाबत असे वक्तव्य केले, जे ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले.

हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर बुधवारी न्यूझीलंडविरुद्ध भारताचा युवा सलामीवीर शुबमन गिलने खेळलेली खेळी अवघ्या जगाचे चाहते झाली आहे. जिथे एकाही भारतीय फलंदाजाला ४० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही, तिथे या खेळाडूने दुहेरी शतक झळकावून आपली प्रतिभा जगाला दाखवून दिली. २०८ धावांच्या खेळीत शुबमन गिलने १४९ चेंडूंचा सामना केला आणि या दरम्यान त्याच्या बॅटमधून १९ चौकार आणि ९ गगनचुंबी षटकार निघाले. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि सध्याचे समालोचक संजय मांजरेकर यांना गिलची षटकार मारण्याची क्षमता आवडली आणि त्यांनी गिलची तुलना माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीशी केली.

India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
india vs south africa 3rd t20I match india eye batting revival against sa at centurion
भारतीय फलंदाजांकडे लक्ष; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा ट्वेन्टी२० सामना आज; सूर्यकुमार, पंड्याकडून अपेक्षा
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’
Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
Sanju Samson breaks Dhoni record to become joint 7th Indian batter
Sanju Samson : संजू सॅमसनने धोनीला मागे टाकत केला खास पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला सातवा भारतीय
Virat Kohli comes now it seems like he can be dismissed without any issues says Aakash Chopra
Virat Kohli : ‘आता असं वाटतं की विराटला कोणत्याही अडचणीशिवाय…’, भारताच्या रनमशीनबद्दल आकाश चोप्राचे मोठे वक्तव्य
Mohammad Kaif says Every club has bowlers like Ajaz Patel
Mohammad Kaif : ‘एजाज पटेलसारखे गोलंदाज प्रत्येक क्लबमध्ये सापडतील…’, मुंबईतील पराभवानंतर मोहम्मद कैफ टीम इंडियावर संतापला

संजय मांजेरकर यांनी धोनीशी केली गिलची तुलना

मांजरेकर म्हणाले की, “गिल ज्या प्रकारे सरळ षटकार मारतो तो एमएस धोनीची आठवण करून देतो.” यानंतर तो असेही म्हणाला की, “एका डावात इतके सरळ षटकार मी कधीच पाहिलेले नाहीत.” गिलच्या फलंदाजीने मांजरेकर इतके प्रभावित झाले की त्यांनी पुन्हा ट्विटमध्ये आपले मन सांगितले. येथे त्याने गिलच्या षटकार मारण्याच्या क्षमतेची एमएस धोनीशी तुलना केली.

शुबमन गिलची खेळी पाहिल्यानंतर, मांजरेकर यांनी ट्विट केले की, “जेव्हा मी पहिल्यांदा धोनीला पाहिले की तो अधिकतर सरळ षटकार मारत असे, तेव्हा त्याने मला सांगितले की जेव्हा मोठ्या फटकेबाजीची वेळ येते तेव्हा तो खेळाडू सातत्यपूर्ण असेल. शुबमन गिलकडे ही त्याचीच एक देन आहे धोनीकडून त्याला भेट मिळाली आहे. त्याच्यासाठी फिंगर क्रॉस्ड!

हेही वाचा: Wrestlers Protest: ब्रिजभूषण सिंह कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरून पायउतार? २२ जानेवारीच्या एजीएम बैठकीनंतर घेणार निर्णय

शुबमन गिलने आपल्या डावातील पहिला षटकार ठोकून आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर दुसऱ्या टोकाकडून विकेट पडत असताना गिलही मोठे फटके खेळणे टाळत होता. मात्र दीडशेच्या जवळपास पोहोचताच त्याने जबरदस्त रूप धारण केले. गिलनेही एका षटकारासह १५० धावा पूर्ण केल्या. यानंतर गिलने टिकनरच्या 48व्या षटकात दोन षटकार ठोकले, तर लॉकी फर्ग्युसनने ४९व्या षटकात षटकारांची हॅट्ट्रिक मारून द्विशतक पूर्ण केले. गिलने डावाच्या शेवटच्या १० षटकांमध्ये त्याच्या ९ पैकी शेवटचे ७ षटकार मारले, यातील बहुतेक शॉर्ट्स त्याने समोरच्या दिशेने खेळले.