भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात शुबमन गिलने शानदार द्विशतक झळकावले. गिलने ८७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने १४५ चेंडूत द्विशतक झळकावले. गिलचे वनडे कारकिर्दीतील हे तिसरे आणि सलग दुसरे शतक ठरले. गिल अखेर १४९ चेंडूत २०८ धावा काढून बाद झाला, ज्यात १९ चौकार आणि ९ षटकारांचा समावेश होता. या दरम्यान त्याने अनेक विक्रम रचले.

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये या खेळीदरम्यान गिलने विराट कोहली आणि शिखर धवनचा मोठा विक्रम मोडीत काढला. गिल आता वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० धावा पूर्ण करणारा भारताचा फलंदाज आहे. त्याच्या आधी हा विक्रम विराट आणि धवनच्या नावावर होता. या दोघांनी २४-२४ डावात हा पराक्रम केला, तर गिलने १९व्या एकदिवसीय डावात हा पराक्रम केला. मात्र, पाकिस्तानच्या फखर जमानचा विश्वविक्रम केवळ एका डावाने मोडण्यात गिलला मुकावे लागले.

Akash Deep has revealed How Virat Kohli gifted his bat that saved Gabba Test for India
Virat Kohli : ‘मी बॅट मागितली नव्हती, त्यानेच…’, गाबा कसोटी वाचवणाऱ्या आकाशदीपचा विराटच्या बॅटबद्दल मोठा खुलासा
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Kagiso Rabada create history first SA20 2025 Bowler to bowl 2 consecutive maiden overs in the powerplay
SA20 2025 : कगिसो रबाडाने घडवला इतिहास! अश्विन-चहलला मागे टाकत ‘हा’ पराक्रम करणारा जगातील पहिला गोलंदाज
NZ vs SL Sri Lanka beat New Zealand by 140 runs Mark Chapman 82 runs in 3rd ODI match at Eden Park
NZ vs SL : तिसऱ्या वनडेत श्रीलंकेने उडवला न्यूझीलंडचा धुव्वा, मार्क चॅपमनची खेळी ठरली व्यर्थ
Yuvraj Singh expresses his feelings on India defeat against New Zealand sports news
न्यूझीलंडविरुद्धचा पराभव सर्वात निराशाजनक; माजी अष्टपैलू युवराज सिंगची भावना
Loksatta anvyarth Gautam Gambhir India lose in Test series
अन्वयार्थ: खरेच ‘गंभीर’ आहोत?
IND vs AUS Who is Beau Webster Debutante who hit the winning four for Australia in his Sydney test in BGT 2025
IND vs AUS : पदार्पणात अर्धशतक अन् विजयी चौकार! कोण आहे ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ब्यू वेबस्टर? सिडनी कसोटीत भारतासाठी ठरला डोकेदुखी
Sunil Gavaskar upset that he was Not called to hand over Border Gavaskar Trophy to Australia IND vs AUS
IND vs AUS: सुनील गावस्करांचा ऑस्ट्रेलियात अपमान? नाराजी व्यक्त करत म्हणाले, “मी भारतीय आहे म्हणून…”

वनडे क्रिकेटमध्ये फखर जमानच्या नावावर सर्वात जलद १००० धावा पूर्ण करण्याचा विक्रम आहे. फखरने १८ एकदिवसीय डावात ही कामगिरी केली. गिलने मात्र १९ डावात १००० वनडे धावा करणाऱ्या इमाम-उल-हक या पाकिस्तानच्या आणखी एका फलंदाजाची बरोबरी केली आहे. गिलने ३२.४षटकात चौकार मारून हा विक्रम आपल्या नावावर केला. गिलने या यादीत विव्ह रिचर्ड्स, केविन पीटरसन, जोनाथन ट्रॉट, क्विंटन डिकॉक, बाबर आझम यांसारख्या दिग्गज फलंदाजांना मागे टाकले आहे.

हेही वाचा – IND vs NZ 1st ODI: शुबमन गिलचा भीम पराक्रम! द्विशतक झळकावणारा ठरला जगातील सर्वात युवा फलंदाज

सर्वात जलद १००० धावा (एकदिवसीय आंतरराष्ट्रीय):

१. फखर जमान (पाकिस्तान) – १८ डाव
२. शुभमन गिल (भारत) – १९ डाव
३. इमाम-उल-हक (पाकिस्तान) – १९ डाव
४. व्हिव्हियन रिचर्ड्स (वेस्ट इंडिज) – २१ डाव
५. केविन पीटरसन (इंग्लंड/आयसीसी) – २१ डाव
६. जोनाथन ट्रॉट (इंग्लंड) – २१ डाव
७. क्विंटन डिकॉक (दक्षिण आफ्रिका) – २१ डाव
८. बाबर आझम (पाकिस्तान) – २१ डाव
९. रॅसी व्हॅन डर डुसेन (दक्षिण आफ्रिका) – २१ डाव

Story img Loader