Double Century of Shubman Gill: भारत आणि न्यूझीलंड संघांत पहिला वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्यात युवा फलंदाज शुबमन गिलने विक्रमी द्विशतक झळकावले. त्याने १४९ चेंडूत २०८ धावा केल्या. त्याचबरोबर वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा जगातील आठवा फलंदाज ठरला आहे. त्याच्या द्विशतकाच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित ५० षटकांत ८ बाद ३४९ धावाांचा डोंगर उभारला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा गिल हा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. वयाच्या २३ व्या वर्षी त्याने हा पराक्रम केला. यापूर्वी हा विक्रम इशान किशनच्या नावावर होता, ज्याने वयाच्या २४ व्या वर्षी बांगलादेशविरुद्ध द्विशतक झळकावले होते

शुबमन गिलने १४९ चेंडूचा सामना करताना आपल्या खेळीत १९ चौकार आणि ९ षटकार लगावले. त्याचबरोबर तो भारताकडून वनडेत द्विशतक झळकावणारा पाचवा फलंदाज ठरला आहे.

वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारे हे पाच भारतीय खेळाडू –

सचिन तेंडुलकर २००* वि. दक्षिण आफ्रिका २०१०
वीरेंद्र सेहवाग २१९ वि. वेस्ट इंडीज २०११
रोहित शर्मा २०९ वि. ऑस्ट्रेलिया २०१३
रोहित शर्मा २६४ वि. श्रीलंका २०१४
रोहित शर्मा २०८* वि. श्रीलंका २०१७
इशान किशन २१० वि. बांगलादेश २०२२
शुभमन गिल २०८ वि. न्यूझीलंड २०२३

हेही वाचा – SAT20: विल जॅकने सीमारेषेवर पकडला आश्चर्यकारक झेल; पाहून स्टीफन फ्लेमिंगदेखील झाला थक्क; पाहा VIDEO

बुधवारी हैदराबादमध्ये झंझावाती खेळी करताना शुबमन गिलने वनडे क्रिकेटमध्ये हजार धावा पूर्ण केल्या. २३ वर्षीय शुबमन गिलने अवघ्या १९व्या डावात हजार धावा पूर्ण केल्या आहेत. सर्वात कमी डावात हजार धावा करणारा गिल आता संयुक्तपणे जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. गिलने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमलाही मागे टाकले आहे. बाबर आझमने २१ डावात हजार धावा पूर्ण केल्या होत्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs nz 1st odi shubman gill became the youngest batsman in the world to score a double century vbm