Double Century of Shubman Gill:न्यूझीलंडविरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला विजय मिळवून देण्यात सलामीवीर शुबमन गिलचा मोलाचा वाटा होता. सलामीला येताना शुबमनने एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावले. त्याने १४९ चेंडूत २०८ धावांची खेळी केली, ज्यात त्याने १९ चौकार आणि ९ षटकार लगावले. शुबमनच्या या खेळीच्या जोरावर भारताला ३४९ धावा करता आल्या. या खेळीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. यानंतर त्याने आपल्या द्विशतकाबद्दल प्रतिक्रिया दिली.
सामन्यानंतर शुबमन म्हणाला, “मी मैदानावर जाऊन मला जे करायचे आहे, ते करण्याची मी आतुरतेने वाट पाहत होतो. विकेट्स पडल्यामुळे, मला मुक्तपणे खेळायचे होते आणि शेवटी मी ते करू शकलो याचा मला आनंद आहे. काहीवेळा जेव्हा गोलंदाज शीर्षस्थानी असतो, तेव्हा तुम्हाला त्याच्यावर दडपण टाकण्याची गरज असते. डॉट बॉल टाळण्याची गरज आहे, काही हेतू दर्शविणे आवश्यक आहे आणि काही अंतरांने जोरदार प्रहार करणे आवश्यक आहे. मी तेच करत होतो.”
द्विशतकाबाबत तो म्हणाला, “मी २०० धावांचा विचार करत नव्हतो, पण एकदा ४७ व्या षटकात षटकार मारल्यानंतर मला वाटले की मी ते करू शकेन.” पूर्वी मला जे येत होतं ते मी खेळत होतो. तो (किशन) माझ्या सर्वोत्तम टीममेट्सपैकी एक आहे. त्याने वनडेत द्विशतक झळकावले तेव्हा मी तिथे होतो आणि ते विशेष होते. जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट नियमितपणे करायची असते, तेव्हा छान वाटते. निश्चितच समाधान वाटते. द्विशतक बऱ्यापैकी झळकले आहे. खेळ माझ्या अपेक्षेपेक्षा पुढे गेला.
हेही वाचा – IND vs NZ 1st ODI: शुबमन गिलने रोहित-इशानचा मोडला विक्रम; ‘ही’ कामगिरी करणारा ठरला जगातील आठवा फलंदाज
टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोमहर्षक विजयाची नोंद करून पाहुण्या संघाचा पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने ८ गडी गमावून ३४९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघाला ४९.२ षटकांत सर्वाबाद ३३७ धावा करता आल्या. ज्यामुळे त्यांना सामना १२ धावांनी गमावला. न्यूझीलंड संघाकडून मायकेल ब्रेसवेलने सर्वाधिक १४० धावा केल्या. त्याचबरोबर मिचेल सँटनरने ५७ धावांचे योगदान दिले.