भारत आणि न्यूझीलंड संघांत वनडे मालिकेतीत पहिला सामना हैदराबाद येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात शुबमन गिलने वनडे क्रिकेटमधील सलग दुसरे शतक. त्याने ८७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्यामुळे भारतीय संघाने दोनशे धावांचा डोंगर पार उभारला.
या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या विकेट्साठी शानदार फलंदाजी केली. रोहित शर्मा आणि शुबमन गिलने ६० धावांची भागीदारी केली. त्यानंतर रोहित शर्मा बाद झाला.कर्णधार रोहित शर्माने आजच्या सामन्यात ३८ चेंडूत ३४ धावा केल्या. या दरम्यान त्याने आपल्या खेळीत २ षटकार आणि ४ चौकार लगावले.
रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहलीदेखील फक्त ८ धावांचे योगदान देऊन बाद झाला. त्याचबरोबर इशान किशन ५ आणि सूर्यकुमार यादव ३१ धावा करुन बाद झाले. सूर्यकुमार यादव बाद झाला तेव्हा भारतीय संघाने २८.३ षटकांत ४ बाद १७५ धावा केल्या होत्या. त्यानंतर आता भारतीय संघाने ३५ षटकांच्या समाप्तीनंतर ४ बाद २२० धावांचा डोंगर उभारला.
भारतीय संघाकडून शुबमन गिल १२० आणि उपकर्णधार हार्दिक पांड्या १३ धावांवर नाबाद आहेत. न्यूझीलंड संघाकडून गोलंदाजी करताना हेन्री शिपले आणि मायकेल ब्रेसवेल वगळता इतर ४ गोलंदाजांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.