भारत आणि न्यूझीलंड संघात तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला वनडे सामना ऑकलंड येथे खेळला जात आहे. या सामन्यात अंतिम टप्प्यात वाशिंग्टन सुंदर केलेल्या झटपट खेळीमुळे भारताने तीनशे धावांचा टप्पा पार केला. न्यूझीलंडसाठी सर्वोत्तम गोलंदाजी करणाऱ्या मॅट हेन्रीने वॉशिंग्टन सुंदरने जोरदार समाचार घेतला. शेवटच्या षटकात सुंदरने २ चौकार आणि एक जबरदस्त षटकार लगावला. त्याच्या खेळीमुळे भारताने न्यूझीलंड संघाला ३०७ धावांचे लक्ष्य दिले आहे.

वॉशिंग्टन सुंदरने अवघ्या ६ चेंडूत न्यूझीलंडच्या गोलंदाजांची अवस्था बिघडवली. या ६ शॉट्सच्या जोरावर वॉशिंग्टन सुंदरने अशी अप्रतिम कामगिरी केली की, ज्याची कुणालाही अपेक्षा नव्हती. संजू सॅमसन बाद झाल्यानंतर हा डावखुरा फलंदाज क्रीजवर उतरला आणि हा खेळाडू श्रेयस अय्यरला स्ट्राईक देईल अशी अपेक्षा होती, पण सुंदरच्या मनात एक वेगळीच योजना होती. सुंदरने सामन्यात अवघ्या १६ चेंडूत ३७ धावा ठोकल्या. ज्यामध्ये ३ चौकार आणिल ३ षटकारांचा समावेश होता.

वॉशिंग्टन सुंदरची शानदार खेळी –

वॉशिंग्टन सुंदरने आपल्या खेळीत केवळ १६ चेंडूचा सामना केला पण यादरम्यान त्याने ६वेळा चेंडू सीमारेषेचा पार घालवला. सुंदरने पूर्णपणे झोपून मॅट हेन्रीच्या चेंडूवर चौकार लगावला. वास्तविक हेन्रीने चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर फेकला. यॉर्करऐवजी त्याचा चेंडू लोअर फुल टॉस झाला आणि सुंदरने स्कूप खेळून चौकार लगावला. यादरम्यान तो जमिनीवर झोपला होता.

हेही वाचा – IND vs NZ 1st ODI: शिखर धवनला बाद करताच टीम साऊथीने रचला मोठा विक्रम; ठरला जगातील पहिलाच गोलंदाज

सुंदरच्या या शॉटनंतर त्याची तुलना विकेटच्या मागे शॉट्स खेळण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सूर्यकुमार यादवशी झाली. वॉशिंग्टन सुंदर ९ महिन्यांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये फलंदाजीसाठी आला होता. यापूर्वी हा खेळाडू ११ फेब्रुवारीला वेस्ट इंडिजविरुद्ध फलंदाजी करताना दिसला होता.

Story img Loader