IND vs NZ Shardul Thakur: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंचे खांदे पडत होते आणि सामना कर्णधार रोहित शर्माच्या डोळ्यांसमोर पराभव येत होता, तेवढ्यात एक खेळाडू आला आणि टीम इंडियाच्या विजयाचा सर्वात मोठा हिरो ठरला. या खेळाडूने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला विजय मिळवून देऊन कर्णधार रोहित शर्माची मान वाचवली. जेव्हा न्यूझीलंडचा फलंदाज मायकल ब्रेसवेल भारतीय गोलंदाजांची जोरदार मुसंडी मारत होता, तेव्हा कर्णधार रोहित शर्माने शार्दूल ठाकूर नावाचे एक ब्रह्मास्त्र काढून न्यूझीलंड संघाला ढेर केले.

इंग्रजीत एक वाक्प्रचार आहे, ‘वन्स अ कॅप्टन ऑलवेज अ कॅप्टन’ ना… या वाक्याचे उदाहरण बुधवारी रात्री हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पाहायला मिळाले. टीम इंडियाने भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना १२ धावांनी जिंकला, ज्यामध्ये शुबमन गिल, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, तर विराट कोहलीच्या सल्ल्याने सामना भारताच्या झोतात आला. प्रथम फलंदाजी करताना शुबमन गिलच्या द्विशतकाच्या जोरावर टीम इंडियाने पाहुण्यांसमोर ३५० धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या टॉप ऑर्डरला झपाटय़ाने बिथरवले होते, पण मायकेल ब्रेसवेलच्या तुफानी खेळीने टीम इंडियासह तमाम चाहत्यांना धक्का दिला होता.

Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Alzarri Joseph fined by ICC for abusing fourth umpire in WI-BAN ODI Month after two-match ban for on-field tiff
Alzarri Joseph: अल्झारी जोसेफला दोन सामन्यांच्या बंदीनंतर ICC ने ठोठावला दंड, पंचांना केली होती शिवीगाळ
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
Captain Rohit Sharma reacts after disappointing Adelaide Test performance by batsmen sports news
फलंदाजांची कामगिरी निराशाजनक, गोलंदाजीत बुमराला साथ आवश्यक! अॅडलेड कसोटीनंतर कर्णधार रोहितची प्रतिक्रिया
India Women Vs Australia Women Cricket 2nd ODI India loses against Australia  sport news
भारतीय महिला संघाची पुन्हा हाराकिरी ; दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची सर्वोच्च धावसंख्येसह सरशी
Rohit Sharma on Mohammed Shami Fitness and Comeback in Team for last 3 Test Against Australia
IND vs AUS: मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबद्दल रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, दुसऱ्या कसोटी पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?
Rohit Sharma Statement on India Defeat in Pink Ball Test Said we didnt play well enough to win the game
IND vs AUS: भारताने पिंक बॉल कसोटी गमावण्यामागचं रोहित शर्माने सांगितलं कारण, कोणाच्या डोक्यावर फोडलं पराभवाचं खापर?

५७ चेंडूत शतक झळकावणाऱ्या या खेळाडूने सामन्यात उत्साह भरला आणि एकहाती संघाला विजयानजीक नेले. शेवटच्या षटकात न्यूझीलंडला २० धावांची गरज असताना कर्णधार रोहित शर्माने चेंडू शार्दुल ठाकूरकडे सोपवला. ब्रेसवेलने आपली धडाकेबाज फलंदाजी सुरू ठेवली आणि शार्दुल ठाकूरचे षटकाराने स्वागत केले, परंतु यानंतर विराट कोहलीने असे काही सांगितले ज्यामुळे शार्दुल ठाकूरने चित्र पालटत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

काय सल्ला दिला विराट कोहलीने?

विराट कोहलीने शार्दुल ठाकूरला पुढच्या चेंडूवर यॉर्कर टाकण्यास सांगितले, अष्टपैलूने माजी कर्णधाराची आज्ञा पाळली आणि १४०च्या वैयक्तिक स्कोअरवर ब्रेसवेलला (एलबीडब्ल्यू) पायचीत बाद केले. त्याच्या विकेटमुळे न्यूझीलंडचा डाव ३३७ धावांवर आटोपला आणि भारताने हा सामना १२ धावांनी जिंकला. सामन्यानंतर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना शार्दुल ठाकूरने विराट कोहलीच्या या सल्ल्याची माहिती दिली. शार्दुल ठाकूर म्हणाला, “विराट भाऊने मला फलंदाजाला बाद करण्यासाठी यॉर्कर चेंडू टाकण्यास सांगितले, हा सल्ला मी आपली आज्ञा शिरसावंद्य मानत त्याचे अनुकरण केले, कारण तो आमच्यासाठी विशेष विजयचा होता.”

हेही वाचा: IND vs NZ 1st ODI: “हे क्रिकेट नाही…!” इशान किशनच्या वागण्यावर सुनील गावसकर भडकले, थेट कॉमेन्ट्री बॉक्समधून टोचले कान

रोहित शर्मा सामन्यानंतर नाराज

भारतीय संघाने काल विजय मिळवला असला तरी देखील तो नाराज होता कारण अवघ्या १२ धावांनी न्यूझीलंडवर मात केली. एवढ्या जवळ न्यूझीलंड आलीच कशी यावर टीम मिटिंगमध्ये चर्चा होणार अशी माहिती देखील त्याने दिली. त्याचवेळी ब्रेसवेल सामन्यानंतर म्हणाला, “आम्ही फक्त स्वतःला संधी देण्याचा प्रयत्न करत होतो. दुर्दैवाने आम्ही शेवटी चुकलो. सँटनर आणि मी चांगली भागीदारी केली आणि खेळ शेवटपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेरीस भरपूर धावा शिल्लक होत्या. शेवटच्या टप्प्यात त्याने खरोखरच चांगली गोलंदाजी केली. शेवटच्या षटकात २० धावा हव्या होत्या आणि आजचा दिवस माझा नव्हता. हे माझ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचे सुरुवातीचे दिवस आहेत आणि माझ्याकडे या गोलंदाजांचे फारसे फुटेजही नाही.”

Story img Loader