पहिल्या टी-२० सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून २१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. आपल्या डावाच्या शेवटच्या षटकात न्यूझीलंडने अर्शदीप सिंगविरुद्ध तुफानी फलंदाजी करत २७ धावा केल्या. या २७ धावा भारताच्या पराभवाचे कारण ठरल्या. वास्तविक, शेवटच्या षटकाच्या आधी किवी फलंदाजाने धमाकेदार फलंदाजी केली. यानंतर कर्णधार हार्दिक पांड्यांची रिअॅक्शन व्हायरल होत आहे.
विशेषत: २०व्या षटकातील अर्शदीपचा पहिला चेंडू नो बॉल होता, ज्यावर फलंदाजाने शानदार षटकार ठोकला लगावला. यानंतर, डॅरिल मिशेलने पुढच्या फ्रि-हीट चेंडूवर षटकार लगावत कायदेशीर एका चेंडूवर १३ धावा केल्या. येथून हे षटक महागात पडू शकते यांचा अंदाज आला होता.
षटकाची सुरुवात इतकी धमाकेदार झालेली पाहून कर्णधार हार्दिकलाही धक्का बसला.
त्याचवेळी फलंदाजाचा धमाका पाहून कर्णधार हार्दिकने आकाशाकडे बघायला सुरुवात केली. यानंतर मिशेलने दुसऱ्या चेंडूवरही षटकार मारून ३ षटकारांची हॅट्ट्रिक पूर्ण केली. डॅरिल मिशेलने या दरम्यान २६ चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याचे हे टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील चौथे अर्धशतक होते.
हेही वाचा – SA vs ENG: चालू सामन्यात पंचांचा बेजबाबदारपणा; प्रेक्षकांकडे पाहताना केले असे काही की VIDEO होतोय व्हायरल
तिसऱ्या चेंडूवर फलंदाजाने चौकार मारला आणि त्यानंतर चौथ्या चेंडूवर फलंदाजाला धावा करता आल्या नाहीत. येथून गोलंदाजालाही दिलासा मिळाला, तर हार्दिकनेही सुटकेचा नि:श्वास सोडला. पुढच्या ३ चेंडूंवर २-२ धावा केल्या. अशा प्रकारे षटकात २७ धावा झाल्या. ज्यामुळे संघाची धावसंख्या २० षटकात ६ गडी गमावून १७६ धावांपर्यंत पोहोचली.
भारतीय संघाला १७७ धावांचे लक्ष्य मिळाले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. त्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या आणि सूर्याने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु ते दोघे देखील अपयशी ठरले. या दोघानंतर वाशिंग्टन सुंदर एकाकी झुंज देत अर्धशतक झळकावले. दरम्यान त्याला देखील भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले. ज्यामुळे भारतीय संघ निर्धारित २० षटकांत ९ बाद १५५ धावाच करता आल्या.