माजी सलामीवीर गौतम गंभीरने युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. उमरान मलिकने आपल्या वेगाशी कधीही तडजोड करू नये, असे त्याने म्हटले आहे. गंभीरच्या म्हणण्यानुसार, उमरान मलिक एखाद्या सामन्यात महागडा ठरला तरीही त्याने आपला वेग कमी करू नये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उमरान मलिकला श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. त्याने आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीने ही निवड योग्य ठरवली. त्याने ४ षटकात केवळ २७ धावा देत २ बळी घेतले. त्याने सामना भारताच्या आवाक्याबाहेर जात असताना, श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाची विकेट घेतली. उमरानने १५५ किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करून शनाका चकित केले.

गौतम गंभीरच्या म्हणण्यानुसार, उमरानने आपला वेग असाच राखला पाहिजे, परिस्थिती कोणतीही असो. स्टार स्पोर्ट्सवरील संवादादरम्यान तो म्हणाला, ”असे अनेक सामने असतील, ज्यात उमरान मलिक जोरदार गोलंदाजी करेल. त्याचबरोबर असे अनेक सामने असतील, जेव्हा तो खूप महागडा ठरेल.”

तरीही तुम्ही त्यांच्यासोबत जाल का? या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाला, ”गोलंदाजी प्रशिक्षक त्याला वेगवान गोलंदाजी करण्यास प्रोत्साहन देतील किंवा महागडे असल्याचे सिद्ध झाल्यास त्याला हळू गोलंदाजी करण्यास सांगतील का? तेव्हा तुम्हाला उमरान मलिककडून ही गोष्ट बघायला आवडणार नाही.”

हेही वाचा – ‘…. म्हणून पाकिस्तानात भारतासारखी Spin Friendly खेळपट्टी बनवता येत नाही’, मोहम्मद युसूफचे स्पष्टीकरण

गौतम गंभीर पुढे म्हणाला, ‘एकतर तुमच्याकडे वेग राहो किंवा न राहो. एकतर तुम्ही वेगवान गोलंदाजी करा किंवा करू नका. येथे व्यवस्थापनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. उमरान मलिक जितके जास्त खेळेल, तितका तो प्रभावी होत जाईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना तुम्ही स्वतःकडून शिकता.”