टी२० विश्वचषक २०२२ च्या उपांत्य फेरीत पराभूत झालेले दोन संघ आता आठवडाभरानंतर पुन्हा मैदानात उतरले आहेत आणि या स्पर्धेनंतर दोघेही एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ३ सामन्यांची टी२० मालिका खेळवली जाणार आहे आणि ती शुक्रवार १८ नोव्हेंबरपासून वेलिंग्टनमध्ये सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या विश्वचषकादरम्यान काही सामन्यांमध्ये पावसाचा प्रभाव पाहता शेजारील देश न्यूझीलंडमधील चाहत्यांनाही या सामन्यावर हवामानाचा परिणाम होण्याची भीती वाटत असून वेलिंग्टनमधील परिस्थितीही चांगली दिसत नाहीये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

न्यूझीलंडची कमान केन विल्यमसनच्या हाती असली तरी भारतीय संघाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे आहे. हार्दिक पांड्याला भविष्यातील टी२० कर्णधार बनण्याचा दावा करण्याची ही उत्तम संधी आहे. या मालिकेसाठी न्यूझीलंडने जवळपास समान संघ मैदानात उतरवला आहे जो टी२० विश्वचषक २०२२ मध्ये दिसला होता, जिथे ट्रेंट बोल्टला विश्रांती देण्यात आली होती. दुसरीकडे भारतीय संघात अनेक बदल करण्यात आले आहेत. या मालिकेत कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, दिनेश कार्तिक आणि आर अश्विन या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत श्रेयस अय्यर, शुबमन गिल आणि उमरान मलिक या भारतीय संघातील युवा खेळाडूंना यावेळी कामगिरी करून दाखवण्याची संधी असेल.

वेलिंग्टनमधील हवामान अंदाज

दोन्ही संघांमधील तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिला सामना वेलिंग्टन येथे खेळला जाईल. मात्र, विजयी सुरुवात करण्याची इच्छा असलेल्या दोन्ही संघांच्या इराद्यावर पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे. सध्या ऑस्ट्रेलिया खंडात पावसाचे दिवस सुरू आहेत. टी२० विश्वचषकातील अनेक सामन्यांना याचा फटका बसला. आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यातही पाऊसच अडथळा ठरू शकतो. स्थानिक हवामान खात्याच्या अंदाजानुसार शुक्रवारी वेलिंग्टनमध्ये पावसाची शक्यता आहे. सकाळी आणि दुपारी पाऊस पडण्याची शक्यता तब्बल ९६ टक्के इतकी सांगितली जातेय. तर, सूर्यास्ताच्या वेळी ही शक्यता ७६ टक्के आहे. त्यामुळे हा सामना पावसामुळे रद्द होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा :   IND vs NZ: विश्वचषकातील ‘जखमी’ संघ भारत विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने, पहिल्या टी२० सामन्याची माहिती एकाच क्लिकवर

पिच रिपोर्ट

न्यूझीलंडमध्ये अनेकदा मोठ्या धावसंख्येचे सामने पाहायला मिळत असले तरी वेलिंग्टनची खेळपट्टी थोडी वेगळी आहे. येथे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाची सरासरी धावसंख्या केवळ १६२ धावांची आहे. येथे मागील ७ सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ५ वेळा विजय मिळवला आहे. बहुतांश प्रसंगी हा विजय मोठ्या धावांच्या फरकाने मिळाला आहे. म्हणजेच या विकेटवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणे फायदेशीर ठरू शकते, असे म्हणता येईल.