पहिल्या डावात भारतीय संघाला १६५ धावांवर माघारी धाडल्यानंतर, न्यूझीलंडने ३४८ धावांपर्यंत मजल मारत सामन्यात १८३ धावांची आघाडी घेतली. न्यूझीलंडकडून कर्णधार केन विल्यमसन, रॉस टेलर, कॉलिन डी-ग्रँडहोम, जेमिसन आणि ट्रेंट बोल्ट यांनी आश्वासक फलंदाजी केली. भारताकडून पहिल्या डावात इशांत शर्माने निम्मा संघ गारद केला.

अवश्य वाचा – Ind vs NZ : निम्मा संघ गारद करणारा इशांत म्हणतो, मी खुश नाही…

या कामगिरीसह इशांत शर्माने भारतीय संघाचा माजी गोलंदाज झहीर खानच्या कामगिरीशी बरोबरी केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा ५ बळी घेण्याच्या झहीरच्या विक्रमाशी इशांतने बरोबरी केली आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा ५ बळी घेणारे भारतीय गोलंदाज –

  • कपिल देव – १३१ सामने, ४३४ बळी (२३ वेळा)
  • झहीर खान – ९२ सामने, ३११ बळी (११ वेळा)
  • इशांत शर्मा – ९७ सामने, २९७ बळी (११ वेळा)
  • जवागल श्रीनाथ – ६७ सामने, २३६ बळी (१० वेळा)
  • इरफान पठाण – २९ सामने, १०० बळी (७ वेळा)
  • वेंकटेश प्रसाद – ३३ सामने, ९६ बळी (७ वेळा)

दरम्यान, जसप्रीत बुमराहने तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच वॉटलिंगला माघारी धाडत न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. मात्र यानंतर कॉलिन डी-ग्रँडहोम आणि जेमिसन यांनी ७१ धावांची भागीदारी रचत न्यूझीलंडची बाजू अधिक भक्कम केली. या भागीदारीदरम्यानच यजमान संघाने भारतावर शतकी आघाडी घेतली. आश्विनने जेमिसनला माघारी धाडत भारताला यश मिळवून दिलं. मात्र ट्रेंट बोल्टने अखेरच्या विकेटसाठीही फटकेबाजी करत भारतीय गोलंदाजांना चांगलंच झुंजवलं. बोल्टने ३८ धावा केल्या. भारताकडून इशांतने ५, रविचंद्रन आश्विनने ३ तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

Story img Loader