कर्णधार केन विल्यमसन आणि रॉस टेलर यांच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर यजमान न्यूझीलंडने वेलिंग्टन कसोटी सामन्यात आघाडी घेतली आहे. भारतीय संघाला पहिल्या डावात १६५ धावांवर गारद केल्यानंतर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजाचा नेटाने सामना करत, सामन्यावर आपली पकड घट्ट बसवली. कर्णधार विल्यमसन आणि रॉस टेलर यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी रचत संघाचं पारडं जड ठेवलं.

अवश्य वाचा – Ind vs NZ : अजिंक्य रहाणेच्या कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच घडली ‘ही’ गोष्ट

विल्यमसनने आपल्या ठेवणीतले फटके खेळत सुरेख फटकेबाजी केली. आपला १०० वा कसोटी सामना खेळणाऱ्या रॉस टेलरनेही त्याला चांगली साथ दिली. ही जोडी मैदानावर स्थिरावलेली असतानाच, इशांत शर्माने पुन्हा एकदा भारताला यश मिळवून दिलं. ४४ धावांवर खेळत असताना इशांतने टाकलेल्या बाऊन्सर चेंडूचा अंदाज न आल्याने टेलर पुजाराच्या हाती झेल देऊन माघारी परतला. याचसोबत कसोटी क्रिकेटमध्ये रॉस टेलरला सर्वाधिकवेळा बाद करणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत इशांतला आता तिसरं स्थान मिळालं आहे.

इशांत शर्मानेच भारताला पहिलं यश मिळवून दिलं. सलामीवीर टॉम लॅथमला यष्टीरक्षक पंतकडे झेल देण्यास भाग पाडत इशांतने न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. यानंतर विल्यमसन आणि ब्लंडल यांची भागीदारीही इशांतने ब्लंडलचा त्रिफळा उडवत मोडली.

अवश्य वाचा –  Video : हवा तेज चलता है, टोपी संभालो ! केन विल्यमसनसोबत घडला मजेशीर प्रसंग

Story img Loader