Sarfaraz Khan praises by David Warner after 1st Century during IND vs NZ Match : या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा सरफराज खानने भारतासाठी पदार्पण केले होते, तेव्हा त्याचे वडील नौशाद खान यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये म्हणाले होते की, ‘रात को वक्त दो गुजारने के लिए, सूरज अपने ही समय पर ही निकलेगा’. आता त्यांच्या मुलाने त्यांची मान अभिमानाने उंचावली आहे. सर्फराझ खानने शनिवारी बंगळुरू येथे सुरू असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीच्या दुसऱ्या डावात शतक झळकावून भारतीय संघाचा डाव सावरला. आता त्याच्या या शतकावर ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज डेव्हिड वार्नरने प्रतिक्रिया दिली आहे.

डेव्हिड वॉर्नरकडून सर्फराझचे कौतुक –

डेव्हिड वॉर्नरने २६ वर्षीय सर्फराझच्या शतकी खेळीचे आणि मेहनतीचे कौतुक केले. त्याचबरोबर इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने लिहिले, “शाबास सर्फराझन. तुझ्या एवढ्या मेहनतीनंतर हे शतक पाहून आनंदा झाला.” त्याचवेळी वॉर्नरने शेअर केलेल्या सरफराजच्या फोटोंच्या कोलाजवर हिंदीत लिहिले आहे की, ‘रात को वक्त दो गुजारने के लिए, सूरज अपने ही समय पर निकलेगा’.

George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Captain Rohit Sharma reacts after disappointing Adelaide Test performance by batsmen sports news
फलंदाजांची कामगिरी निराशाजनक, गोलंदाजीत बुमराला साथ आवश्यक! अॅडलेड कसोटीनंतर कर्णधार रोहितची प्रतिक्रिया
U19 Asia Cup Final Bangladesh Beat India by 59 Runs And Successfully Defend the Title INDU19 vs BANU19
IND U19 vs BAN U19: बांगलादेशची पोरं हुशार; युवा भारतीय संघाला नमवत पटकावलं U19 आशिया कपचं जेतेपद
Rohit Sharma on Mohammed Shami Fitness and Comeback in Team for last 3 Test Against Australia
IND vs AUS: मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबद्दल रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, दुसऱ्या कसोटी पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?
Mohammed Siraj Statement on Travis Head Sendoff Incident Said Its a lie that he said well bowled to me
Siraj on Travis Head Fight: “हेडने सांगितलं ते खोटं आहे…”, मोहम्मद सिराजचं ट्रॅव्हिस हेडच्या वादावर मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाला?
Travis Head Statement on Mohammed Siraj Fight and Send Off Said I Said Well Bowled IND vs AUS 2nd Test
Travis Head on Siraj Fight: “मी म्हणालो चांगला चेंडू होता पण त्याने…”, सिराज आणि हेडमध्ये नेमका कशावरून झाला वाद? ट्रॅव्हिस हेडने सामन्यानंतर सांगितलं
Travis Head Fastest Century in Day Night Test Match IND vs AUS Adelaide Test
Travis Head: ट्रॅव्हिस हेडचे डे-नाईट कसोटीत सर्वात जलद शतक, स्वत:चा रेकॉर्ड मोडत केली मोठी कामगिरी; भारत बॅकफूटवर

सर्फराझच्या वडिलांचे शब्द ठरले खरे –

देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा केल्यानंतर सर्फराझ खानला अखेर फेब्रुवारी २०२४ मध्ये भारतासाठी कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली. कर्णधार रोहित शर्माने त्याला कॅप दिली तेव्हा सर्फराझचे वडील भावूक झाले होते. त्यानंतर सर्फराझ फलंदाजीसाठी आला, तेव्हा त्याच्या वडिलांना कॉमेंट्री बॉक्समध्ये बोलावण्यात आले. हिंदी समालोचक आकाश चोप्राने विचारले की, तुमच्या मुलाला इतक्या उशिरा पदार्पण करण्याची संधी मिळाली हे कसे वाटते? सर्फराझ खानच्या वडिलांनी उत्तर दिले, ‘रात को वक्त दो गुजारने के लिए, सूरज अपने ही समय पर निकलेगा’. आज त्यांच्या मुलाने शतक झळकावून त्यांचे शब्द खरे केले.

हेही वाचा – Rishabh Pant : ऋषभ पंत ठरला दुर्दैवी! अवघ्या एका धावेने हुकले ऐतिहासिक कसोटी शतक; स्टेडियमसह ड्रेसिंग रूममध्ये पसरली भयाण शांतता

सर्फराझने टिम साऊदीविरुद्ध चौकार मारून पूर्ण केले शतक –

२६ वर्षीय सर्फराझने शुक्रवारी विराट कोहली (१०२ चेंडूत ७०) सोबत तिसऱ्या विकेटसाठी १३६ धावांची भागीदारी केली. तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर कोहली बाद झाल्यानंतर ही भागीदारी मोडली. सर्फराझने चौथ्या दिवशी ७० धावांवरुन डावाला सुरुवात केली आणि वेगवान धावा करत शतक झळकावले. त्याने ९०.९ च्या स्ट्राइक रेटने पहिले कसोटी शतक झळकावले. सर्फराझने टिम साऊदीविरुद्ध चौकार मारून आपले शतक पूर्ण केले.

हेही वाचा – Sarfaraz Khan : सर्फराझने पहिले शतक झळकावत केला मोठा पराक्रम, भारतासाठी ‘ही’ खास कामगिरी करणारा ठरला दुसरा फलंदाज

सर्फराझ खानने पहिले शतक पूर्ण करताच त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याने शतकानंतर धावत मैदानाला राऊंड मारला. त्यानंतर क्रीजवर उपस्थित असलेल्या ऋषभ पंतने त्याची गळाभेट घेतली. भारतीय ड्रेसिंग रूममध्येही जल्लोष पाहिला मिळाला. पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडिया केवळ ४६ धावांवर गारद झाली होती, ज्यामध्ये पाच खेळाडूंना खातेही उघडता आले नव्हते. मात्र, भारताने दुसऱ्या डावात दमदार पुनरागमन केले. यशस्वी जैस्वालने ३५ आणि कर्णधार रोहित शर्माने ५२ धावांचे योगदान दिले. त्याचबरोबर विराट कोहलीने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ७० धावांची खेळी साकारली.

Story img Loader