India vs New Zealand 2nd ODI Match Updates: शनिवारी (दि. २१ जानेवारी) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील दुसरा एकदिवसीय सामना रायपूर येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ८ गडी राखून विजय मिळवला. भारताच्या गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी या विजयात मोलाचा वाटा उचलला. या विजयासह भारताने मालिकेत २-०ने आघाडी घेतली. भारताकडून कर्णधार रोहित शर्मा याने अर्धशतक झळकावले.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर १०९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली होती. कर्णधार रोहित शर्माने शानदार अर्धशतकी खेळी खेळली. न्यूझीलंडने समोर ठेवलेल्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा व शुबमन गिल या जोडीला फार कष्ट घ्यावे लागले नाही. धावा सहजतेने त्यांच्या बॅटीतून निघत होत्या आणि या दोघांनी चौथ्यांदा अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. रोहितची फटकेबाजी आज पाहण्यासारखी होती. कर्णधार म्हणून रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आज १००० धावा पूर्ण केल्या.

Ajit Pawar on Yogi Adityanath
योगी आदित्यनाथांमुळे अजित पवारांची गोची; मोदी-शाहांची एकही सभा नाही; अस्तित्वाची लढाई राष्ट्रवादी कशी लढणार?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर
Ajit Pawar on Ramraje Naik Nimbalkar
Ajit Pawar : “…मग मी बघतो, तुम्ही आमदार कसे राहता”, अजित पवारांचा रामराजे निंबाळकरांना इशारा; म्हणाले, “धमक असेल तर…”
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
devendra fadnavis, public rally, nagpur west assembly constituency
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही पाकिस्तानमधून उमेदवार…”
cid aahat serials in marathi
‘सीआयडी’ आणि ‘आहट’ मालिकांचा थरार आता मराठीत; कधी आणि कुठे बघाल या मालिका, जाणून घ्या…
pm narendra modi criticized congress
PM Narendra Modi : “महाविकास आघाडीच्या गाडीला ना चाक, ना ब्रेक, चालकाच्या सीटसाठीही…”; धुळ्यातील सभेतून पंतप्रधान मोदींचे टीकास्र!

रोहित शर्मा आणि शुबमन गिल जेव्हा खेळपट्टीवर फलंदाजी करत होते, त्यावेळी वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. १०व्या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेकदरम्यान एक तरुण सुरक्षा कर्मचाऱ्यांना चकवून स्टेडियममध्ये शिरला अन् त्याने रोहितला मिठी मारली. त्यानंतर सुरक्षा कर्मचारी त्याला पकडण्यासाठी धावले अन् रोहितने त्यांना लहान मुलगा आहे त्याला सोडा असे सांगितले.

रोहित शर्माच्या एका चाहत्याला स्वत:ला सावरता आले नाही आणि तो सुरक्षेचा भंग करत मैदानात घुसला. सुरक्षेचा प्रश्न असल्याने रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांच्यासह न्यूझीलंडचे सर्व खेळाडूही मैदानात धावणारे चाहते पाहून आश्चर्यचकित झाले. पण जेव्हा चाहत्याने रोहित शर्माला मिठी मारताना दिसले तेव्हा सर्वांना समजले की तो रोहितचा चाहता आहे. यानंतर सुरक्षा दलाचे जवान तात्काळ सतर्क झाले आणि त्यांनी त्या तरुणाला मैदानाबाहेर काढले.

भारताची मालिकेत २-० विजयी आघाडी

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी सार्थ ठरवत न्यूझीलंडला कमी धावसंख्येवर रोखले. न्यूझीलंडने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ३४.३ षटकात सर्व विकेट्स गमावत फक्त १०८ धावा केल्या. हे आव्हान भारतीय संघाने २०.१ षटकात २ गड्याच्या मोबदल्यात १११ धावा करत पूर्ण केले.

हेही वाचा: IND vs NZ 2nd ODI: भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या ठेचल्या नांग्या! तब्बल ८ विकेट्सने उडवला धुव्वा, मालिकेत २-०ने विजयी आघाडी

भारताकडून फलंदाजी करताना कर्णधार रोहित शर्मा याने सर्वाधिक धावा केल्या. रोहितने या सामन्यात ५० चेंडूंचा सामना करताना ५१ धावांये योगदान दिले. या धावा करताना रोहितने २ षटकार आणि ७ चौकारांचा पाऊसही पाडला. रोहितव्यतिरिक्त या सामन्यात शुबमन गिल याने नाबाद ४० धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, विराट कोहली याला फक्त ११ धावांवर समाधान मानावे लागले. तसेच, इशान किशन यानेही नाबाद ८ धावांचे योगदान दिले. मात्र, भारताने सहजरीत्या सामना खिशात घातला.