भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रविवारी हॅमिल्टन येथे होणार आहे. टीम इंडियासाठी हा सामना करो या मरो अशा प्रकारचा असणार आहे. हा सामना गमावल्याने भारतीय संघ मालिकाही गमावेल. ऑकलंडमध्ये शुक्रवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने भारताचा सात गडी राखून पराभव केला. ३०६ धावा करूनही टीम इंडियाचा पराभव झाला. उत्कृष्ट फॉर्मात असलेल्या केन विलियम्सन आणि टॉम लॅथम यांनी भारतासमोर अडचणी निर्माण केल्या आणि लक्ष्य सहज गाठले. अशा स्थितीत भारतीय गोलंदाजांना दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पहिल्या सामन्यातील चुका सुधारून चांगली गोलंदाजी करणे गरजेचे आहे.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ अधिक गोलंदाजी पर्यायांसह मैदानात उतरू शकतो. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने पाच गोलंदाज खेळवले होते. अशी टीका माजी खेळाडूंनी केली होती. वसीम जाफर आणि मायकेल वॉनसारख्या माजी महान खेळाडूंनी सांगितले की, संघाकडे गोलंदाजीचे किमान सहा पर्याय असले पाहिजेत. टीम इंडियाला सहाव्या गोलंदाजाची उणीव जाणवत होती. याचाच फायदा घेत विलियम्सन आणि लॅथम यांनी भारतीय गोलंदाजांची दाणादाण उडवली. कर्णधार शिखर धवन आणि मुख्य प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण अधिक चांगल्या रणनीतीसह मैदानात उतरू इच्छित आहेत.

Harbhajan Singh believes India has a 50-50 chance of retaining the Border-Gavaskar Trophy in Australia
Harbhajan Singh : ‘जर सुरुवात चांगली झाली नाही तर…’, हरभजन सिंगचे पर्थ कसोटीपूर्वी मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पहिलाच सामना खूप…’
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Shubman Gill ruled out of first Test match in Perth because of fractured thumb IND vs AUS Border Gavaskar Trophy
IND vs AUS: शुबमन गिल ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या कसोटीतून बाहेर, टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या, ‘हा’ खेळाडू करणार पदार्पण?
india vs south africa 3rd t20I match india eye batting revival against sa at centurion
भारतीय फलंदाजांकडे लक्ष; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा ट्वेन्टी२० सामना आज; सूर्यकुमार, पंड्याकडून अपेक्षा
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’
IND vs SA 3rd T20 Match Timing Changes India vs South Africa centurion
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना दुसऱ्या सामन्यापेक्षा उशिराने सुरू होणार, जाणून घ्या काय आहे नेमकी वेळ?
Team India Performance in Border Gavaskar Trophy played at Australia
Team India : टीम इंडियाची ऑस्ट्रेलियामध्ये कामगिरी खूपच निराशाजनक, तब्बल ‘इतक्या’ वेळा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत पत्करावा लागलाय पराभव

टीव्हीवर सामना कसा पाहायचा, याची चिंता अनेक चाहत्यांना लागली आहे. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला टीव्ही किंवा मोबाईलवर दुसरी एकदिवसीय कशी पाहू शकता ते सांगत आहोत. यासाठी तुम्हाला काही व्यवस्था करावी लागेल. तुमच्याकडे डीडी फ्री डिश असल्यास, तुम्ही डीडी स्पोर्ट्सवर सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. जर तुमच्याकडे फ्री डिश नसेल तर तुम्ही ‘फायर स्टिक’द्वारे अॅमेझॉन प्राइम टीव्हीवर थेट सामने पाहू शकता. फायर स्टिकला स्मार्ट टीव्हीशी कनेक्ट करा, तुमच्या Amazon प्राइम खात्यात लॉग इन करा आणि नंतर टीव्हीवर सामन्याचा आनंद घ्या.

हेही वाचा :   IND vs NZ: मायकल वॉनने धवन-लक्ष्मणच्या निर्णयावर उपस्थित केले प्रश्न; म्हणाला, ‘टीम इंडिया जुन्या….!’

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघात काही बदल होऊ शकतात. अष्टपैलू दीपक हुडा याला संधी दिली जाऊ शकते. तसेच फिरकीपटू चहल ऐवजी कुलदीपला संघात स्थान मिळू शकते. वेगवान गोलंदाजीत फारसे बदल होईल असे सध्या तरी चित्र दिसत नाही. भारत आणि न्यूझीलंडचे संघ एकदिवसीय फॉरमॅटमध्ये १११ वेळा आमनेसामने आले आहेत. भारताने यातील ५५ सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर न्यूझीलंडने ५० सामने जिंकले आहेत. एक सामना बरोबरीत तर पाच सामने अनिर्णित राहिले. भारत हा पहिला संघ आहे ज्याविरुद्ध न्यूझीलंडने एकदिवसीय सामन्यांमध्ये ५० सामने जिंकले आहेत.

सामना कुठे, कधी, कसा पहायचा

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना हॅमिल्टन येथील सेडॉन पार्क स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना सकाळी ७ वाजता होईल सुरु होईल तर ६.३० नाणेफेक असणार आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर भारताचे एकदिवसीय मालिकेतील सामन्यांचे प्रसारित करण्याचे अधिकार डीडी स्पोर्ट्सकडे आहेत. हे फक्त डीडी फ्री डिशवर आहे. डीडी फ्री डिशवर डीडी स्पोर्ट्स चॅनलवर तुम्ही सामन्याचा विनामूल्य आनंद घेऊ शकता.

हेही वाचा :   IND vs NZ: पराभवानंतर श्रेयस अय्यरने दिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘थेट भारतातून येऊन इथे….!’

भारतीय संघ

शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टिरक्षक), शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युजवेंद्र चहल, अरविंद चहल, अरविंद चहल. सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.

न्यूझीलंड संघ

केन विलियम्सन (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, फिन ऍलन, डेव्हन कॉनवे, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, अॅडम मिल्ने, टिम साउदी