भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना रविवारी हॅमिल्टन येथील सेडॉन पार्क स्टेडियमवर खेळवला जाणार होता. टीम इंडियासाठी हा सामना करो या मरो अशा प्रकारचा असणार होता. हा सामना गमावल्याने भारतीय संघ मालिकाही गमावेल अशी परिस्थिती होती. शेवटी न्यूझीलंडमध्ये शिखर धवनच्या नेतृत्वाखाली युवा टीम इंडियाचे मालिका विजयाचे स्वप्न भंगले. मालिका वाचविण्यासाठी भारताला तिसरा आणि अंतिम सामना जिंकणे गरजेचा आहे, जेणेकरून मालिकेत बरोबरी साधता येईल.

सकाळी न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने सलग दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघांनी आजच्या सामन्यात बदल केला होता. न्यूझीलंड संघात दुखापतग्रस्त अॅडम मिल्नेच्या जागी मायकेल ब्रेसवेलला स्थान देण्यात आले होते. तसेच भारतीय संघातही दोन बदल करण्यात आले होते. संजू सॅमसनच्या जागी अष्टपैलू दीपक हुडाचा तर शार्दुल ठाकूरच्या जागी दीपक चहरला संधी देण्यात आली होती. शार्दूल ठाकूरला पाठीचा त्रास अधिक जाणवत असल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून संघ व्यवस्थापनाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

Harbhajan Singh believes India has a 50-50 chance of retaining the Border-Gavaskar Trophy in Australia
Harbhajan Singh : ‘जर सुरुवात चांगली झाली नाही तर…’, हरभजन सिंगचे पर्थ कसोटीपूर्वी मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पहिलाच सामना खूप…’
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
KL Rahul returns to nets after injury scare ahead BGT
KL Rahul : टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! पर्थ कसोटी सामन्यापूर्वी ‘हा’ स्टार खेळाडू दुखापतीतून सावरला
Shubman Gill ruled out of first Test match in Perth because of fractured thumb IND vs AUS Border Gavaskar Trophy
IND vs AUS: शुबमन गिल ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या कसोटीतून बाहेर, टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या, ‘हा’ खेळाडू करणार पदार्पण?
Mohammed Shami Will Join Team India Squad for Border Gavaskar Trophy After 2nd Test Reveals Childhood Coach IND vs AUS
IND vs AUS: मोहम्मद शमी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात कधी होणार सामील? कोचने दिले अपडेट
IND vs SA 3rd T20I Match Stopped Due to Flying Ants engulfed the Centurion Stadium
IND vs SA: ना पाऊस, ना खराब हवामान… चक्क कीटकांनी रोखला भारत-आफ्रिका सामना, मैदानात नेमकं काय घडलं?
IND vs SA 3rd T20 Match Timing Changes India vs South Africa centurion
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना दुसऱ्या सामन्यापेक्षा उशिराने सुरू होणार, जाणून घ्या काय आहे नेमकी वेळ?

तत्पूर्वी, सामना सुरु होण्याआधी हॅमिल्टन येथील सेडॉन पार्कवर खूप पाऊस पडला असल्याने मैदान ओलसर झाले होते. त्यामुळे नाणेफेकीला देखील विलंब झाला. १५ मिनिटे उशिराने सामन्याला सुरुवात झाली होती. भारतीय प्रमाणवेळेनुसार ६.४५ मिनिटांनी नाणेफेक न होता ती ७.०० वाजता झाली होती. पुन्हा सुरु झालेल्या पावसामुळे सामना थांबविण्यात आला तेव्हा पहिल्या पाच षटकात भारतीय सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली होती. पण त्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली.

हेही वाचा :   IPL: आयपीएल चांगलीच! “विश्वचषकातील खेळाडूंच्या खराब कामगिरीवर..”, गौतम गंभीरने केले मोठे विधान

त्यानंतर तब्बल तीन तास पावसाने खोडा घातल्यामुळे सामना थांबविण्यात आला होता. अखेर भारतीय प्रमाणवेळेनुसार ११.१० मिनिटांनी सामन्याला पुन्हा सुरुवात झाली आणि पावसामुळे सामन्यातील नियमात बरेच बदल करण्यात आले होते. पंचानी सांगितलेल्या माहितीनुसार २९-२९ षटकांचा सामना होणार होता.  त्या दरम्यान भारताचा कर्णधार शिखर धवनच्या रूपाने एक विकेट गमावली. त्यानंतर आलेला मिस्टर ३६० सूर्यकुमार यादवने शुबमन गिलसोबत ६६ धावांची ताबडतोड भागीदारी केली. सूर्यकुमार यादव ३४ धावांवर तर शुबमन गिल ४५ धावांवर असताना पुन्हा पावसाला सुरुवात झाली आणि अखेर सामना रद्द करण्यात आला.

हेही वाचा :   IND vs NZ 2nd ODI: सामन्याला सुरुवात! परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सूर्यकुमारने मारलेल्या फेरफटक्याचा video व्हायरल

ऑकलंडमध्ये शुक्रवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने भारताचा सात गडी राखून पराभव केला होता. ३०६ धावा करूनही टीम इंडियाचा पराभव झाला. उत्कृष्ट फॉर्मात असलेल्या केन विलियम्सन आणि टॉम लॅथम यांनी भारतासमोर अडचणी निर्माण केल्या आणि लक्ष्य सहज गाठले. अशा स्थितीत भारतीय गोलंदाजांना तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पहिल्या सामन्यातील चुका सुधारून चांगली गोलंदाजी करणे गरजेचे आहे. मालिका बरोबरीत सोडवण्याची ही शेवटची संधी असेल.