भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना रविवारी हॅमिल्टन येथील सेडॉन पार्क स्टेडियमवर खेळवला जाणार होता. टीम इंडियासाठी हा सामना करो या मरो अशा प्रकारचा असणार होता. हा सामना गमावल्याने भारतीय संघ मालिकाही गमावेल अशी परिस्थिती होती. शेवटी न्यूझीलंडमध्ये शिखर धवनच्या नेतृत्वाखाली युवा टीम इंडियाचे मालिका विजयाचे स्वप्न भंगले. मालिका वाचविण्यासाठी भारताला तिसरा आणि अंतिम सामना जिंकणे गरजेचा आहे, जेणेकरून मालिकेत बरोबरी साधता येईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सकाळी न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने सलग दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघांनी आजच्या सामन्यात बदल केला होता. न्यूझीलंड संघात दुखापतग्रस्त अॅडम मिल्नेच्या जागी मायकेल ब्रेसवेलला स्थान देण्यात आले होते. तसेच भारतीय संघातही दोन बदल करण्यात आले होते. संजू सॅमसनच्या जागी अष्टपैलू दीपक हुडाचा तर शार्दुल ठाकूरच्या जागी दीपक चहरला संधी देण्यात आली होती. शार्दूल ठाकूरला पाठीचा त्रास अधिक जाणवत असल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून संघ व्यवस्थापनाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
तत्पूर्वी, सामना सुरु होण्याआधी हॅमिल्टन येथील सेडॉन पार्कवर खूप पाऊस पडला असल्याने मैदान ओलसर झाले होते. त्यामुळे नाणेफेकीला देखील विलंब झाला. १५ मिनिटे उशिराने सामन्याला सुरुवात झाली होती. भारतीय प्रमाणवेळेनुसार ६.४५ मिनिटांनी नाणेफेक न होता ती ७.०० वाजता झाली होती. पुन्हा सुरु झालेल्या पावसामुळे सामना थांबविण्यात आला तेव्हा पहिल्या पाच षटकात भारतीय सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली होती. पण त्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली.
त्यानंतर तब्बल तीन तास पावसाने खोडा घातल्यामुळे सामना थांबविण्यात आला होता. अखेर भारतीय प्रमाणवेळेनुसार ११.१० मिनिटांनी सामन्याला पुन्हा सुरुवात झाली आणि पावसामुळे सामन्यातील नियमात बरेच बदल करण्यात आले होते. पंचानी सांगितलेल्या माहितीनुसार २९-२९ षटकांचा सामना होणार होता. त्या दरम्यान भारताचा कर्णधार शिखर धवनच्या रूपाने एक विकेट गमावली. त्यानंतर आलेला मिस्टर ३६० सूर्यकुमार यादवने शुबमन गिलसोबत ६६ धावांची ताबडतोड भागीदारी केली. सूर्यकुमार यादव ३४ धावांवर तर शुबमन गिल ४५ धावांवर असताना पुन्हा पावसाला सुरुवात झाली आणि अखेर सामना रद्द करण्यात आला.
ऑकलंडमध्ये शुक्रवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने भारताचा सात गडी राखून पराभव केला होता. ३०६ धावा करूनही टीम इंडियाचा पराभव झाला. उत्कृष्ट फॉर्मात असलेल्या केन विलियम्सन आणि टॉम लॅथम यांनी भारतासमोर अडचणी निर्माण केल्या आणि लक्ष्य सहज गाठले. अशा स्थितीत भारतीय गोलंदाजांना तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पहिल्या सामन्यातील चुका सुधारून चांगली गोलंदाजी करणे गरजेचे आहे. मालिका बरोबरीत सोडवण्याची ही शेवटची संधी असेल.