India vs New Zealand 2nd ODI Match Updates: भारतीय संघ सध्या मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिला सामना शनिवार (२१ जानेवारी) रायपूरमध्ये आयोजित केला गेला. रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल. भारतीय संघ मालिका नावावर करण्याच्या विचारासह शनिवारी या मैदानात उतरेल. तर दुसरीकडे पाहुण्या न्यूझीलंड संघाला मालिकेत बरोबरी साधावी लागेल. रायपूरमध्ये खेळला जाणारा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना असून भारतीय खेळाडूंना देखील याठिकाणी खेळण्याचा अनुभव नाहीये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टीम इंडियाचा कर्णधार पुन्हा एकदा नशीबवान ठरला आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यादरम्यान रोहित २० सेकंदासाठी विसरला की नक्की काय घेऊ…फलंदाजी घेऊ की गोलंदाजी? त्याच्या या गोंधळामुळे न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमलाही काही सुचेना की रोहित असा करतो आहे. रोहित शर्माने शार्दूल ठाकूरला संघात कायम ठेवले असून उमरान मलिकला काही काळ अजून वाट बघावी लागेल असे त्याने सांगितले.

रोहित शर्माने दिले यावर उत्तर

रवी शास्त्री म्हणाले की रोहित नेमकं काय झालं? यावर रोहित शर्मा म्हणाला की, “आम्हाला काय करायचे आहे ते मी विसरलो, नाणेफेकीच्या निर्णयाबाबत संघाशी भरपूर चर्चा केली, फक्त कठीण परिस्थितीत स्वतःला आव्हान द्यायचे होते, पण आम्ही प्रथम गोलंदाजी करू.” पुढे तो म्हणाला की, “”पहिला एकदिवसीय सामना आमच्यासाठी चांगलाच आव्हानात्मक खेळाडूंची कसोटी घेणारा ठरला होता, कारण फलंदाजी करण्यासाठी खेळपट्टी अधिक चांगली होईल आणि तेच आमच्यासमोर आव्हान होते. मायकेल ब्रेसवेलने चांगली फलंदाजी केली, पण शेवटी आम्ही चांगली गोलंदाजी केली आणि सामना जिंकला.”

भारताचा कर्णधार संघ निवडीबाबत म्हणाला की, “काल सराव सत्रादरम्यान थोडे दव पडले होते, परंतु आम्ही क्युरेटरकडून ऐकले आहे की आजच्या सामन्यात त्याचा फारसा काही परिणाम होणार नाही. आम्ही हैदराबादमध्ये प्रथम फलंदाजी केली म्हणून आम्ही या सामन्यात गोलंदाजी करून  आम्हाला धावांचा पाठलाग करता येतो का हे पाहणार आहोत. मागील सामन्यातील संघच आजच्या सामन्यात खेळणार असेही तो म्हणाला आहे.”

हेही वाचा: Yuzvendra Chahal Ind vs NZ: “अच्छा फ्यूचर है तेरा!” युजवेंद्र चहलने केलेल्या टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूम कव्हरेजवर रोहितची मिश्कील टिप्पणी, video व्हायरल

दोन्ही गोलंदाज संघासाठी महत्त्वाचे आहेत

म्हांब्रे म्हणाले की, शार्दूल ठाकूर आणि उमरान मलिक दोघेही वेगवेगळ्या प्रकारे संघासाठी महत्त्वाचे आहेत. तो म्हणाला, ‘आम्ही ठाकूरची निवड त्याच्या फलंदाजीमुळे केली. तो फलंदाजीत सखोलता देतो. आम्ही खेळपट्टी बघू आणि मग त्यानुसार कॉम्बिनेशन ठरवू. त्याने भारतासाठी चांगली कामगिरी केली आहे. मलिक बद्दल म्हांब्रे म्हणाले, “तो ज्या प्रकारे प्रगती करत आहे ते पाहून आनंद होतो. वेगही महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे गोलंदाजी आक्रमणाला वेगळे आयाम मिळतात. त्याला खेळवण्याचा निर्णय खेळपट्टी आणि संघ संयोजनाची गरज यावर अवलंबून असेल. जोपर्यंत विश्वचषकाचा संबंध आहे, तो रणनीतीमध्ये पूर्णपणे गुंतलेला आहे. तो संघासाठी खूप महत्त्वाचा आहे.”

म्हांब्रे यांनीही केले सिराजचे कौतुक

पारस म्हांब्रे यांनी सिराजचे कौतुक करताना सांगितले की, ‘मी त्याला भारत-अ संघात पाहिले होते. तो लाल चेंडूवर चांगली कामगिरी करत आहे. तो एकेकाळी चेंडू आत आणण्याचा प्रयत्न करायचा पण त्याने त्याच्या सीम पोझिशनवरही काम केले आहे. तो केवळ विश्वचषकासाठीच नाही तर त्याच्या बाहेरही संघाचा महत्त्वाचा सदस्य आहे. आम्ही अशा गोष्टींचा एक तक्ता बनवला आहे ज्यावर आम्हाला लक्ष केंद्रित करायचे आहे आणि या सामन्यात त्यांची अंमलबजावणी करू इच्छितो.

भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल, श्रीकर भरत, रजत पाटीदार , शाहबाज अहमद, उमरान मलिक

न्यूझीलंड संघ

फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार/यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, हेन्री शिपले, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर, मार्क चॅपमन, डग ब्रेसवेल, जेकब डफ

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs nz 2nd odi india wins the toss but forget rohit for 20 seconds even tom latham has no idea video goes viral avw
Show comments