भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना रायपूरमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना ३४.३ षटकांत सर्वबाद १०८ धावा केल्या. त्यामुळे भारताला विजयासाठी १०९ धावांचे लक्ष्य मिळाले. भारतीय संघाकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक ३ बळी घेतले. या दरम्यान न्यूझीलंड संघाने वनडे क्रिकेटमधील एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद केली.

या सामन्यात न्यूझीलंड संघाच्या फलंदाजांनी नाक कापण्याचे काम केले. कारण न्यूझीलंडचा निम्मा संघ इतक्या स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला, जे किवी संघाच्या इतिहासात यापूर्वी कधीही घडले नव्हते. या ब्रेसवेल फिलिप्स आणि सँटनर या तिंघाव्यतिरिक्त कोणत्याही किवी फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. ज्यामुळे न्यूझीलंडचा संघ अवघ्या ३४.३ षटकांत १०८ धावांवर गारद झाला.

Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
India vs South Africa 2nd T20 Highlights in Marathi
IND vs SA 2nd T20I Highlights : रोमांचक सामन्यात यजमानांनी हिरावला भारताच्या तोंडचा घास, ट्रिस्टन स्टब्सच्या वादळी खेळीने फेरले वरुण चक्रवर्तीच्या मेहनतीवर पाणी
AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी
harris rauf celebrating wicket of glen maxwell
Pak vs Aus: भारताविरूद्धची तयारी पडली कांगारुंना भारी; पाकिस्तानने उडवला १४० धावात खुर्दा
Ranji Trophy Mumbai Crush Odisha By An Innings & 103 Runs
Ranji Trophy : शम्स मुलानीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने ओडिशाचा उडवला धुव्वा! एक डाव आणि १०३ धावांनी चारली धूळ
Australia A beat India A by 6 Wickets in in 2nd unofficial Test
IND A vs AUS A : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी भारताची उडाली दाणादाण, दुसऱ्या सराव सामन्यातही हार
Sanju Samson breaks Dhoni record to become joint 7th Indian batter
Sanju Samson : संजू सॅमसनने धोनीला मागे टाकत केला खास पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला सातवा भारतीय

न्यूझीलंड संघाचे ५ फलंदाज अवघ्या १५ धावांवर गारद झाले. न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा ५ खेळाडू इतक्या स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यामुळे या संघाच्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.

पहिल्या ५ विकेट्स गमावताना न्यूझीलंडची वनडे सामन्यातील सर्वात कमी धावसंख्या –

१५/५ विरुद्ध भारत, रायपूर २०२३
१८/५ विरुद्ध श्रीलंका, कोलंबो २००१
२०/५ विरुद्ध बांगलादेश, मीरपूर २०१०
२१/५ विरुद्ध ऑस्ट्रेलिया, फरीदाबाद २००३

हेही वाचा – IND vs NZ 2nd ODI: भारतीय गोलंदाजांपुढे न्यूझीलंडच्या फलंदाजांचे लोटांगण! विजयासाठी केवळ १०९ धावांचे लक्ष्य

तसेच भारतीय संघाच्या गोलंदाजांनीही कधीही कोणत्याही संघाच्या पाच फलंदाजांना इतक्या स्वस्तात परत पाठवले नव्हते. पण हा विक्रम आज भारतीय संघाने नोंदवला आहे.

वनडे क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध ५ विकेट गमावून सर्वात कमी धावसंख्या करणारे संघ –

१५/५ विरुद्ध न्यूझीलंड, रायपूर २०२३
२६/५ विरुद्ध इंग्लंड, ओव्हल २०२२
२९/५ विरुद्ध पाकिस्तान, कोलंबो १९९७
३०/५ विरुद्ध झिम्बाब्वे, हरारे २००५

हेही वाचा – Olympics 2028: क्रिकेटच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का! लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमधून क्रिकेटला डच्चू, ICC देखील हतबल

या सामन्यात भारतीय संघाकडून गोलंदाजीचे शानदार प्रदर्शन पाहायला मिळाले. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. त्याने ६ षटकांत १८ धावा दिल्या. त्याचबरोबर हार्दिक पांड्या आणि वाशिंग्टन सुंदरने प्रत्येकी २ विकेट घेतल्या. तसेच मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर आणि कुलदीप यादव या गोलंदाजांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतली.