भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना आज हॅमिल्टनच्या मैदानावर होत आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधायची आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडचा संघ सलग दुसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करेल. परंतु सध्या हा साामना ४.५ षटकानंतर पावसाचा व्यत्यय आल्याने थांबला आहे.
पावसाचा व्यत्यय भारताला अडचणीत आणणार –
पावसामुळे सामना थांबवण्यात आला असून मैदाना कव्हरने झाकण्यात आले आहे. खेळ थांबला तोपर्यंत भारताने ४.५ षटकांत एकही विकेट न गमावता २२ धावा केल्या होत्या. शुबमन गिल २१ चेंडूत १९ धावा आणि कर्णधार शिखर धवनने ८ चेंडूत २ धावा नाबाद आहे. भारताच्या दृष्टीने आजचा सामना खूप मह्त्वाचा आहे. कारण तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंड संघाने जिंकला आहे. त्यामुळे ते मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. अशा परिस्थित हा सामना होणे भारतासाठी खूप मह्त्वाचे आहे. जर सामना पावसामुळे रद्द झाला आणि तिसरा सामना भारताने जिंकला, तरी मालिका बरोबरीत राहिल. ज्यामुळे भारताचे मालिका जिंकण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही.
सामना सुरु होण्याआधी देखील झाला होता पाऊस –
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही पावसाची शक्यता अगोदर पासूनच होती आणि आता तेच झाले आहे. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेवरही पावसाचा परिणाम झाला होता. आजचा सामना सुरु होण्याआधी देखील हॅमिल्टन येथील सेडॉन पार्कवर खूप पाऊस पडला असल्याने मैदान ओलसर झाले होते. त्यामुळे नाणेफेकीला देखील विलंब झाला होता. १५ मिनिटे उशिराने सामन्याला सुरुवात झाली. भारतीय प्रमाणवेळेनुसार ६.४५ मिनिटांनी नाणेफेक न होता ती ७.०० वाजता झाली. पुन्हा सुरु झालेल्या पावसामुळे सध्या सामना थांबला असून पहिल्या पाच षटकात भारतीय सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत: शिखर धवन (कर्णधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल.
न्यूझीलंड: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन (कर्णधार), डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, मायकेल ब्रेसवेल, मॅट हेन्री, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन.