ऑकलंडच्या मैदानावरील दुसऱ्या वन-डे सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडला २७३ धावांपर्यंत रोखलं. पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारतीय संघाने मधल्या षटकांमध्ये टिच्चून मारा करत न्यूझीलंडच्या धावगतीवर अंकुश लावला होता. मात्र रॉस टेलरने अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत आपलं अर्धशतक झळकावलं आणि संघाला आव्हानात्मक धावसंख्याही उभारुन दिली.

याआधी भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवलं. युजवेंद्र चहल आणि शार्दुल ठाकूरने महत्वाच्या षटकांमध्ये विकेट घेत यजमानांना बॅकफूटला ढकललं. नवदीप सैनीच्या गोलंदाजीवर रॉस टेलरने एक धाव घेण्यासाठी फटका खेळला. मात्र क्षेत्ररक्षणासाठी तैनात असलेल्या रविंद्र जाडेजाने क्षणार्धात चेंडूवर झडप घालत अचूक थ्रो केला आणि डावखुरा जिमी निशम धावबाद झाला. रविंद्र जाडेजाच्या या अफलातून क्षेत्ररक्षणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

भारताकडून युजवेंद्र चहलने ३, शार्दुल ठाकूरने २ तर रविंद्र जाडेजाने १ बळी घेतला. न्यूझीलंडचे दोन फलंदाज धावबाद झाले.

Story img Loader