सूर्यकुमार यादव टी-20 मध्ये चांगली कामगिरी करत आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० मध्ये उत्कृष्ट शतक झळकावले. अशा प्रकारे त्याच्या २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये ११०० धावा पूर्ण झाल्या आहेत. जगातील इतर कोणत्याही फलंदाजाला १००० धावाही पूर्ण करता आल्या नाहीत. त्याचबरोबर त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूर्याने ४९ चेंडूत शतक पूर्ण केले. २०२२ च्या आंतरराष्ट्रीय टी-20 मधील हे त्याचे दुसरे शतक आहे. अशाप्रकारे त्याने रोहित शर्माच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे. २०१८ मध्ये, रोहितने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात २ शतके झळकावली होती. याआधी टी-२० वर्ल्ड कपमध्येही त्याने चांगली कामगिरी करताना २०० हून अधिक धावा केल्या होत्या.

या सामन्यात प्रथम खेळताना टीम इंडियाने ६ गड्यांच्या मोबदल्यात १९१ धावांची मोठी धावसंख्या उभारली. सूर्या ५१ चेंडूत १११ धावा करून नाबाद राहिला. त्याने ११ चौकार आणि ७ षटकार लगावले. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज टीम साऊदीने २० व्या षटकात हॅट्ट्रिक घेत भारतीय धावसंख्या २०० धावांपर्यंत पोहोचू दिली नाही.

हेही वाचा – Cheteshwar Pujara Arjuna Award: …. म्हणून क्रीडा मंत्री पुरस्कार देण्यासाठी पोहोचले क्रिकेटपटूच्या घरी, जाणून घ्या कारण

सूर्यकुमार यादवने यापूर्वी २०२२ मध्ये इंग्लंडविरुद्ध त्याच्या घरच्या मैदानावर ११७ धावांची शानदार खेळी केली होती. भारतीय संघाला हा सामना जिंकता आला नव्हता. तसेच आजचा सामना दोन्ही संघांसाठीमहत्त्वाचा आहे. ३ सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. अशा स्थितीत हा सामना जिंकणारा संघ मालिकेत १-० अशी आघाडी घेईल आणि मालिका गमावण्याचा धोकाही टळेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs nz 2ndt 20i suryakumar yadav ind indian to score 2 centuries in a year equals rohit sharma record vbm