भारतीय महिला क्रिकेट संघ सध्याच्या न्यूझीलंड दौऱ्यात विजयासाठी आसुसलेला आहे. मिताली राजच्या नेतृत्वाखालील संघाला सलग तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात यजमानांच्या हातून पराभवाला सामोरे जावे लागले आहे. क्वीन्सटाउन येथे शुक्रवारी खेळल्या गेलेल्या मालिकेतील तिसऱ्या वनडेत न्यूझीलंडने भारताचा ३ विकेट्सने पराभव केला. टीम इंडियाकडून तीन फलंदाजांनी अर्धशतके झळकावली, पण एमी सॅथरवेट आणि लॉरेन डाऊनच्या खेळीने त्यांचा डाव धुळीस मिळवला. या विजयासह न्यूझीलंडचा संघ ५ सामन्यांच्या वनडे मालिकेत ३-०ने आघाडीवर आहे. याआधी टीम इंडियाला एकमेव टी-२० सामन्यामध्येही पराभवाचा सामना करावा लागला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तिसऱ्या वनडेत भारतीय फलंदाज हरमनप्रीत कौर ज्या पद्धतीने धावबाद झाली, त्यामुळे चाहते निराश झाले आहेत. हरमनप्रीतचा रनआऊटचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भारतीय डावातील २८वे षटक न्यूझीलंडची फिरकी गोलंदाज फ्रान्सिस मॅकवॉय टाकत होती. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर हरमनप्रीतने क्रीझच्या बाहेर येऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू बॅटला नीट न लागल्याने तो थेट गोलंदाजाकडे गेला. मॅकवॉयने पटकन चेंडू यष्टीरक्षक केटी मार्टिनकडे टाकला आणि हरमनप्रीत क्रीजमध्ये परत येईपर्यंत मार्टिनने तिला रनआऊट केले.

हेही वाचा – RANJI : धुरळाच..! बिहारच्या फलंदाजाचा वर्ल्ड रेकॉर्ड; पदार्पणात ५६ चौकार ठोकत झळकावलं त्रिशतक!

या रनआउटचा व्हिडिओ पाहून नेटकरी हरमनप्रीतला ट्रोल करत आहेत. एका यूझरने लिहिले, ‘हरमनप्रीतला संघातून वगळण्याची वेळ आली आहे.’ दुसऱ्या एका यूझरने लिहिले, ‘याच्यापेक्षा गल्ली क्रिकेट चांगले असते.’ हरमनप्रीत गेल्या काही काळापासून खराब फॉर्ममधून जात आहे.