भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना आज इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात भारताने शुबमन आणि रोहितच्या शतकाच्या जोरावर निर्धारित ५० षटकांत ९ बाद ३८५ धावा केल्या.न्यूझीलंडने रोहित आणि शुबमन बाद झाल्यानंतर सामन्यात पुनरागमन केले. त्यामुळे त्याने ३८६ धावांचे लक्ष्य मिळाले. या दरम्यान विराट कोहली आणि इशान किशनचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इशान किशन आणि कोहली यांच्यात गोंधळ –

शुभमन गिलची विकेट पडल्यानंतर इशान किशन क्रीझवर उतरला. किशनने आत येताच एक शानदार षटकार लगावला. तो धोकादायक फॉर्ममध्ये दिसत होता पण त्याचे नशीब खराब निघाले. खरे तर, सामन्याच्या ३५व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर किशनने हलक्या हाताने शॉट लगावला आणि धाव घेण्यासाठी विराटला बोलावले.

त्यानंतर त्याला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात असल्याचे दिसले, त्यानंतर किशन माघारी वळला. तो मागे फिरला तोपर्यंत कोहली त्याच्याकडे आला होता. त्यामुळे दोन्ही भारतीय खेळाडू एकाच दिशेने धावताना दिसले आणि शेवटी किशनने (१७) विराट कोहलीसाठी आपली विकेट बहाल केली. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हेही वाचा – IND vs NZ 3rd ODI: शुबमन गिलचे वादळी शतक; विराटलाही न जमलेल्या बाबरच्या विश्वविक्रमाशी केली बरोबरी

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना, रोहित आणि शुबमनने पहिल्या गड्यासाठी २१२ धावांचे भक्कम भागीदारी केली. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा ८५ चेंडूत १०१ धावा काढून बाद झाला. त्याचबरोबर शुबमनदेखील ७८ चेंडूत ११२ धावांचे योगदान देऊन बाद झाला. त्यानंतर उपकर्णधार हार्दिक पांड्याने ५४ धावांचे योगदान दिले. भारताच्या इतर फलंदाज खास कामगिरी करताना आली नाही.

न्यूझीलंड संघाकडून गोलंदाजी करताना जेकब डफी आणि ब्लेअर टिकनर यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. ज्यामध्ये जेकब डफी १०० धावा दिल्या, तर टिकनरने ७६धावा दिल्या. त्याचबरोबर मायकेल ब्रेसवेलने एक विकेट घेताना ५१ धावा दिल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs nz 3rd odi ishan kishan being run out by virat kohli video is going viral vbm